• Home
  • महाराष्ट्र
  • युद्धजन्य परिस्थितीमुळे पारंपारिक शेगड्यांची मागणी वाढली; १-२ हजारांची किंमत थेट १० हजारांपर्यंत
ताज्या बातम्या

युद्धजन्य परिस्थितीमुळे पारंपारिक शेगड्यांची मागणी वाढली; १-२ हजारांची किंमत थेट १० हजारांपर्यंत

Demand for stoves has increased

Demand for stoves has increased : देशात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता इंधन बाजारावरही दिसू लागला आहे. एलपीजी सिलेंडरच्या संभाव्य तुटवड्याच्या भीतीमुळे पुणे शहरात पारंपारिक शेगड्यांची मागणी अचानक वाढली आहे. मात्र जिथे मागणी वाढत आहे, तिथे पुरवठा कमी असल्याने या शेगड्यांच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती

पारंपारिक मातीच्या किंवा लोखंडी शेगड्या या प्रामुख्याने हाताने तयार केल्या जातात. परंतु अशा शेगड्या बनवणारे कारागीर आता फार कमी उरले आहेत. त्यामुळे उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

शेगड्यांची किंमत आता ४,००० ते १०,००० रुपयांपर्यंत पोहोचली

याचा थेट परिणाम किंमतींवर झाला असून, जी शेगडी पूर्वी साधारण १,००० ते २,००० रुपयांना मिळत होती, त्याच शेगड्यांची किंमत आता ४,००० ते १०,००० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. काही ठिकाणी तर उपलब्धता कमी असल्यामुळे ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचेही दिसत आहे.

पर्यायी इंधन म्हणून पारंपारिक शेगड्यांकडे वळण्यास सुरुवात

शहरातील अनेक कुटुंबांनी गॅसच्या संभाव्य तुटवड्याचा विचार करून पर्यायी इंधन म्हणून पारंपारिक शेगड्यांकडे वळण्यास सुरुवात केली आहे. मात्र कारागिरांची कमतरता आणि मर्यादित उत्पादन यामुळे आता या शेगड्यांचाही तुटवडा जाणवू लागला आहे.

परिणामी, इंधनाच्या तुटवड्यासोबतच पारंपारिक शेगड्यांची उपलब्धताही मोठा प्रश्न बनत असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती कशी बदलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts