Mango After Meals: उन्हाळा आला की आंब्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. अनेकजण जेवण झाल्यानंतर लगेच आंबा खातात. पण ही सवय आरोग्यासाठी योग्य आहे का? याबाबत तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
उन्हाळा आला की आंब्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही. या दिवसांत बहुतांश लोक जेवणानंतर आंबा खायला आवडतात. त्याचा गोड स्वाद विशेषतः लहान मुलांना खूप आवडतो. पण जेवणानंतर लगेच आंबा खाणं योग्य आहे का? शरीरावर काही परिणाम होतो का? चला, याबाबत तज्ज्ञ काय सांगतात ते पाहूया.
हेही वाचा: ही अभिनेत्री 5 वर्षांनी टीव्हीवर परततेय; नवा चेहरा डेब्यूत, प्रोमो पाहिलात का तुम्ही?
उन्हाळा आला की आंबा आणि कलिंगड, टरबूज यांसारख्या फळांची मजा घेण्यासाठी सगळेच उत्सुक असतात. आंबा हा चवीला गोड असण्याबरोबरच पोषक तत्वांनीही समृद्ध आहे. मात्र, तो खाण्याच्या वेळेबाबत अनेक गैरसमज आहेत. विशेषतः रात्री जेवणानंतर लगेच आंबा खाणं योग्य की अयोग्य, याबाबत अनेक प्रश उपस्थित होतात.
आंब्यातील पोषक घटक (प्रति 100 ग्रॅम)
कॅलरीज: 60 kcal
कार्बोहायड्रेट: 15 ग्रॅम
नैसर्गिक साखर: सुमारे 13-14 ग्रॅम
फायबर: 1.5-2 ग्रॅम
प्रोटीन: 0.8 ग्रॅम
फॅट: 0.4 ग्रॅम
व्हिटॅमिन C: 35-40 मिग्रॅ
व्हिटॅमिन A: 50-55 मायक्रोग्रॅम
व्हिटॅमिन E: 0.9 मिग्रॅ
व्हिटॅमिन K: 4-5 मायक्रोग्रॅम
फोलेट (व्हिटॅमिन B9): 40-45 मायक्रोग्रॅम
जेवणानंतर आंबा खाणं योग्य की अयोग्य?
तज्ज्ञांच्या मते, फळ खाण्याची वेळ खूप महत्त्वाची असते. जेवणानंतर आंबा खाणं धोकादायक नाही, पण त्याचा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. आंबा हा नैसर्गिक साखरेने भरलेला आणि थोडा जड फळ आहे.
जेवणानंतर लगेच आंबा खाल्ल्यास
ब्लड शुगर अचानक वाढू शकतो
पचनावर ताण येऊ शकतो
काही वेळा अपचनाची समस्या होऊ शकते
विशेषतः डायबिटीज किंवा इन्सुलिन रेसिस्टन्स असलेल्या लोकांनी याबाबत अधिक काळजी घ्यावी.
काय काळजी घ्यावी?
फळं जेवणाच्या 30 ते 60 मिनिटं आधी खाणं योग्य
जेवणानंतर आंबा खायचा असल्यास 1.5 ते 2 तासांचं अंतर ठेवा
आंबा मर्यादित प्रमाणात खा
दिवसाच्या वेळी आंबा खाणं अधिक फायदेशीर








