Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र दिनापासून पश्चिम आणि मध्य रेल्वे चालवणार अतिरिक्त लोकल रेल्वे
Mumbai

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र दिनापासून पश्चिम आणि मध्य रेल्वे चालवणार अतिरिक्त लोकल रेल्वे

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र दिनापासून पश्चिम आणि मध्य रेल्वे चालवणार अतिरिक्त लोकल रेल्वे

मुंबई Mumbai Local : मुंबईची जीवनवाहीनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेननं प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेनं 1 मे पासून त्यांच्या मार्गांवर अतिरिक्त एसी लोकल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळं प्रवाशांना उकाड्यापासून दिलासा मिळेल.

हेही वाचा : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस

किती लोकल वाढणार :

पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांच्या माहितीनुसार, 1 मे पासून सध्याच्या 12 डब्यांच्या 17 नॉन-एसी सेवांचं 15 डब्यांच्या लोकल सेवांमध्ये रुपांतर केले जाईल. याव्यतिरिक्त, सध्याच्या 12 डब्यांच्या नॉन-एसी सेवांच्या जागी 12 अतिरिक्त 12 डब्यांच्या एसी लोकल सेवा सुरु केल्या जातील. मात्र, पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय सेवांची एकूण संख्या अपरिवर्तित राहील. 15 डब्यांच्या लोकल सेवांची संख्या 227 वरून 244 पर्यंत वाढेल.

विरार-डहाणू सेक्शनवर प्रथमच 15 डब्यांच्या उपनगरीय सेवा :

याशिवायच विरार-डहाणू रोड सेक्शनवर पहिल्यांदाच 8 सेवा सुरु केल्या जातील, ज्यामुळे या सेक्शनवरील प्रवाशांची प्रवासी क्षमता वाढेल आणि सोयीसुविधा सुधारतील. शिवाय, परिचालन कारणांमुळं, 15-डब्यांच्या लोकल सेवा दोन्ही दिशांना ग्रँट रोड स्टेशन, चर्नी रोड स्टेशन आणि मरीन लाइन्स स्टेशनवर थांबणार नाहीत. याव्यतिरिक्त, या गाड्या दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर दुहेरी थांबा घेतील.

एकूण 145 एसी लोकल :

सीपीआरओ विनीत यांनी माहिती दिली की, पश्चिम रेल्वे 12 अतिरिक्त एसी लोकल सेवा देखील सुरु करणार आहे, ज्यामुळं पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय सेक्शनवरील एसी सेवांची एकूण संख्या आठवड्याच्या दिवसांमध्ये (सोमवार ते शुक्रवार) 133 वरुन 145 आणि आठवड्याच्या शेवटी (शनिवार आणि रविवार) 106 वरुन 118 होईल.

हार्बर मार्गावर 14 अतिरिक्त एसी लोकल :

1 मे पासून, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी पनवेल हार्बर मार्गावर 14 अतिरिक्त एसी लोकल सुरु केल्या जातील. 1 मे पासून, मध्य रेल्वेनं हार्बर लाईनवरील 14 नॉन-एसी उपनगरीय सेवा एसीमध्ये श्रेणीसुधारित केल्या आहेत. यामुळं मध्य रेल्वेवरील एसी सेवांची एकूण संख्या 108 होईल, ज्यामध्ये हार्बर लाईनवर 28 आणि मेन लाईनवर 80 सेवांचा समावेश आहे. हार्बर लाईनवर एसी लोकल सेवा यावर्षी 26 जानेवारी रोजी सुरु करण्यात आल्या होत्या.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts