• Home
  • संस्कृती
  • नारळी पौर्णिमा म्हणजे काय? कुठे आणि का साजरी केली जाते? जाणून घ्या आजच्या दिवशीचं महत्व
लाईफस्टाईल

नारळी पौर्णिमा म्हणजे काय? कुठे आणि का साजरी केली जाते? जाणून घ्या आजच्या दिवशीचं महत्व

Narali Purnima 2026
64
Narali Purnima 2026: समुद्राला नारळ अर्पण करण्याची परंपरा, कोळी समाजाचा उत्साह आणि निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा खास दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा. पण हा सण नेमका का साजरा केला जातो आणि त्यामागे काय महत्त्व आहे? चला, जाणून घेऊया.

श्रावण महिन्यातील पौर्णिमेला महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. विशेषतः समुद्राशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या कोळी समाजासाठी या सणाला मोठं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे.

यंदा हा सण २७ ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार असून नारळी पौर्णिमेचा उत्सव प्रामुख्याने महाराष्ट्राच्या (Narali Purnima Maharashtra) समुद्रकिनारी आणि कोकण पट्ट्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर किनारी भागांतील कोळीवाड्यांमध्ये (Koli community tradition) या दिवशी विशेष उत्साह पाहायला मिळतो. (why Narali Purnima is celebrated)

हेही वाचा: ब्रेकअपने उघड केली MPSC पेपरफुटी? औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट

किनाऱ्यावर समुद्राची पूजा, नारळ अर्पण आणि पारंपरिक पद्धतीने (Narali Purnima religious significance) उत्सव साजरा केला जातो. काही ठिकाणी या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आणि मिरवणुकाही आयोजित केल्या जातात.

‘नारळी पौर्णिमा’ नाव कसं पडलं?

या सणातील सर्वात महत्वाची परंपरा म्हणजे समुद्राला नारळ अर्पण करणं. याच नारळामुळे श्रावण पौर्णिमेला महाराष्ट्रात ‘नारळी पौर्णिमा’ हे नाव रूढ झालं. या दिवशी घराघरातही नारळापासून विविध पदार्थ तयार केले जातात. नारळी भात, नारळाच्या वड्या आणि इतर गोड पदार्थांचा नैवेद्य केला जातो.

मासेमारीच्या नव्या हंगामाची सुरुवात

पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीवर काही काळ मर्यादा असतात. नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने समुद्राची पूजा करून सुरक्षितेतची प्रार्थना केली जाते आणि त्यानंतर मासेमारीच्या हंगामाला सुरुवात करण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोळी समाजासाठी हा सण धार्मिक श्रद्धेसोबतच त्यांच्या रोजीरोटीशी जोडलेला महत्त्वाचा दिवस आहे.

नारळी पौर्णिमेचा खास संदेश

नारळी पौर्णिमा केवळ पूजा आणि उत्सवापुरती मर्यादित नाही. समुद्र आपल्याला अन्न आणि रोजगार देतो. त्यामुळे त्याच्याप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा संदेशही या सणातून मिळतो. निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टींचा आदर करा, त्याचं जतन करा आणि त्याच्याशी असलेलं नातं जपा, हा नारळी पौर्णिमेचा सुंदर संदेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts