Meta New Rules: तुम्हीही सतत सोशल मीडिया वापरत असाल, तर ही बातमी महत्त्वाची आहे. Metaने अमेरिकेतील युझर्ससाठी Facebook-Instagram वापराबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. हे नवे नियम नेमके कोणासाठी आहेत आणि आणखी काय बदल होणार आहेत? चला, जाणून घेऊया आजच्या खास लेखातून.
तुम्ही किंवा तुमच्या घरातील मुलं सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतील, तर ही बातमी नक्कीच महत्त्वाची आहे. Metaने अमेरिकेतील 52 राज्ये, प्रदेश आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियाच्या अॅटर्नी जनरल्ससोबत झालेल्या करारानंतर किशोरवयीन युझर्ससाठी हे नवे बदल जाहीर केले आहेत. नव्या नियमांनुसार सोशल मीडिया वापरावर वेळेची (social media time limit) मर्यादा असणार असून, रात्रीच्या वेळेतही Facebook आणि Instagram वापरता येणार नाही. त्यामुळे किशोरवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर लगाम घालण्याच्या Metaच्या या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे. नेमके कोणत्या युझर्सवर हे नियम लागू होणार? दिवसाला किती वेळ Facebook-Instagram वापरता येणार? आणि रात्री कोणत्या वेळेत हे प्लॅटफॉर्म बंद राहणार? चला, जाणून घेऊया.
हेही वाचा: गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; 410 संस्थांचा पेच कायम
दिवसाला फक्त २ तास सोशल मीडिया वापरता येणार
या नव्या नियमानुसार, १८ वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी facebook आणि इंस्टाग्राम मिळून दिवसाला दोन तासांची डिफॉल्ट वापर मर्यादा असेल. ही मर्यादा पालकांच्या परवानगीशिवाय बंद करता येणार आहे. म्हणजेच दोन्ही अॅप्सवर मिळून दोन तास वापर केल्यानंतर किशोरवयीन मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादीत केला जाईल.
रात्री कोणत्या वेळेत हे प्लॅटफॉर्म बंद राहणार?
किशोरवयीन मुलांना सोशल मीडियापासून रात्री विश्रांती मिळावी, यासाठी रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्रामवर डिफॉल्ट ब्लॉक असेल. या काळात Feed, Stories, Explore आणि Reels पाहता किंवा पोस्ट करता येणार नाही. मात्र डायरेक्ट मेसेजिंगला या निर्बंधातून अपवाद देण्यात आला आहे.
शाळेच्या वेळात नोटिफिकेशनही बंद
फक्त रात्रीच नव्हे, तर शाळेच्या वेळेतही सोशल मीडिया वापरावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सकाळी ८ तेदुपारी३ वाजेपर्यंत पुश नोटिफिकेशन्स म्यूट करण्याची व्यवस्था असेल. डायरेक्ट मेसेज आणि अकाउंटच्या सुरक्षा-संबंधित अलर्टना मात्र अपवाद असेल.
दर १५ मिनिटांनी मिळणार रिमाइंडर
किशोरवयीन वापरकर्त्यांना सतत स्क्रीनकडे पाहण्यापासून परावृत्त करण्यासाठी दर १५ मिनिटांनी वापराबाबत रिमाइंडर दिला जाणार आहे. ६० आणि ९० मिनिटांचा वापर पूर्ण झाल्यावरही अतिरिक्त सूचना मिळतील.
हा निर्णय का घेण्यात आला?
Meta वर अमेरिकेतील अनेक राज्यांकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म किशोरवयीन मुलांसाठी व्यसनाधीन ठरतील अशा पद्धतीने डिझाइन केल्याचे आणि त्यांच्या सुरक्षिततेबाबत दिशाभूल केल्याचे आरोप करण्यात आले होते. Meta ने हे आरोप मान्य केलेले नाहीत; मात्र नव्या कराराअंतर्गत किशोरवयीन वापरकर्त्यांसाठी अधिक कडक सुरक्षा उपाय लागू करण्यास कंपनीने सहमती दर्शवली आहे.
या बदलांमुळे अमेरिकेतील किशोरवयीन मुलांचा Facebook आणि Instagram वापरण्याचा अनुभव मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. Meta ने TikTok आणि YouTube सारख्या प्लॅटफॉर्मनाही अशाच प्रकारच्या नियमांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे



