Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रक्षाबंधनासाठी साडी-सूटवर बांगड्यांचा परफेक्ट लूक! हे ७ ट्रेंडी कॉम्बिनेशन नक्की करा ट्राय
लाईफस्टाईल

रक्षाबंधनासाठी साडी-सूटवर बांगड्यांचा परफेक्ट लूक! हे ७ ट्रेंडी कॉम्बिनेशन नक्की करा ट्राय

Raksha Bandhan 2026
3

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनासाठी साडी किंवा एथनिक सूट घालणार असाल, तर योग्य बांगड्यांचा सेट तुमचा लूक आणखी खुलवू शकतो. यंदा राखीला हटके आणि स्टायलिश दिसण्यासाठी बांगड्यांचे हे ७ ट्रेंडी कॉम्बिनेशन नक्की ट्राय करा.

रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाच्या हातावर राखी बांधण्याचा दिवस नाही, तर बहिणींनाही आपल्या लुककडे (Raksha Bandhan look) विशेष लक्ष देण्याचा खास सण आहे. साडी असो किंवा सुंदर एथनिक सूट, योग्य दागिने आणि बांगड्यांचा सेट ( Bangel Set) संपूर्ण लूकमध्ये वेगळाच चार्म आणतो. यंदा रक्षाबंधनासाठी (Raksha Bandhan 2026) पारंपरिक पोशाखाची तयारी करत असाल, तर बांगड्यांचे हे हटके कॉम्बिनेशन नक्की लक्षात ठेवा.

हेही वाचा: भाऊ खास आहे, मग राखीही हटके हवी! यंदा ट्राय करा ‘हे’ अर्थपूर्ण पर्याय

गोल्डन कड्यांसोबत मेटल बांगड्या

साडीचा लूक पारंपरिक आणि एलिगंट ठेवायचा असेल, तर पोशाखाच्या रंगाशी जुळणाऱ्या मेटल बांगड्या निवडा. त्यासोबत गोल्डन कडे घातल्यास साध्या साडीचाही लूक खास दिसू शकतो.

गोल्डन डिझाइनचा एलिगंट टच

खूप हेवी बांगड्या आवडत नसतील तर छोट्या गोल्डन डिझाइनच्या बांगड्या निवडा. त्यासोबत साधे कडे घातल्यास लूक नाजूक आणि स्टायलिश दिसेल. ( LS Marathi News Channel )

लाल पोशाखासोबत वेल्वेट बांगड्या

लाल साडी किंवा सुटवर लाल वेल्वेटच्या बांगड्या अतिशय रॉयल दिसतात. मध्ये गोल्डन कडे किंवा एखादी हेवी बांगडी घातल्यास हातांचा लूक आणखी उठून दिसतो.

रंगीबेरंगी बांगड्यांचा प्रयोग

एकाच रंगाच्या बांगड्या घालण्याऐवजी वेगवेगळ्या शेड्सचे कॉम्बिनेशन करून पाहा. मल्टीकलर बांगड्या साध्या एथनिक सूटवरही आकर्षक दिसतात आणि लूकमध्ये रंगत आणतात.

हिरव्या बांगड्यांचा पारंपरिक अंदाज

हिरव्या बांगड्यांना पारंपरिक पोशाखांमध्ये विशेष महत्व आहे. हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत मोत्यांचे किंवा गोल्डन कडे घातल्यास रक्षाबंधनासाठी सुंदर एथनिक लूक तयार होतो.

दोन रंगाचे कॉम्बिनेशन

गुलाबी- हिरवा, लाल- पिवळा किंवा निळा- गुलाबी अशा दोन रंगाच्या बांगड्यांची जोडी ट्राय करा. मध्ये घुंगरू किंवा डिझायनर बांगडीचा समावेश केल्यास हातांचा लूक आणखी आकर्षक होईल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts