Raksha Bandhan Gold Gifts: लाडक्या बहिणीसाठी रक्षाबंधनांचं गिफ्ट खास असावं, पण नेमकं काय द्यायचं याचा प्रश्न पडतोय? चला तर जाणून घेऊयात तुमच्या बजेट आणि गरजेनुसार हे ३ स्मार्ट पर्याय पाहा.
रक्षाबंधन (Raksha Bandhan 2026 ) म्हणजे फक्त राखी बांधण्याचा सण नाही, तर वाहिनीवरील प्रेम व्यक्त करण्याचा खास दिवस. यंदा बहिणीला हटके आणि भविष्यात (gold gifts for sister) उपयोगी पडणारी भेट द्यायचा विचार करत असाल, तर सोन्याचा पर्याय नक्कीच आकर्षक ठरू शकतो. पण प्रश्न असा आहे की सोन्याचे दागिने घ्यावेत, गोल्ड कॉइन (Gold Coin) की डिजिटल गोल्ड (Digital Gold)?
हेही वाचा: नितीन गडकरींचं ‘मी आता थकलोय’ वक्तव्य; निवृत्तीच्या चर्चांना उधाण, E20 वादाचा संबंध काय?
दागिने की गुंतवणूक?
बहिणीला सोन्याची अंगठी, बांगडी, चेन किंवा कानातले दिले तर भेटीचा आनंद वेगळाच असतो. दागिना वापरता येतो आणि रक्षाबंधनाची आठवणही कायम राहते. मात्र दागिने खरेदी करताना सोन्याच्या किमतीसोबत मेकिंग चार्ज आणि इतर शुल्क भरावे लागतात. भविष्यात विक्री किंवा एक्सचेंज करताना या खर्चाचा पूर्ण फायदा मिळेलच असे नाही.
गोल्ड कॉइनचा पर्याय
जर दागिन्यांऐवजी प्रत्यक्ष सोनं भेट द्यायचं असेल, तर गोल्ड कॉइन हा चांगला पर्याय ठरू शकतो. नाण्याची शुद्धता, वजन आणि हॉलमार्क तपासून खरेदी करता येते. मात्र हे सोनं सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी तुमचीच असते. घरात ठेवताना सुरक्षितेची काळजी घ्यावी लागते.
डिजिटल गोल्डचा ट्रेंड
आजच्या डिजिटल युगात सोनं ऑनलाईन खरेदी करण्याचा पर्यायही लोकप्रिय आहे. डिजिटल गोल्डमध्ये कमी रकमेपासून सुरुवात करता येऊ शकते आणि घरात सोनं ठेवण्याची गरज नसते. मात्र कोणत्या प्लॅटफॉर्मवरून खरेदी करत आहात, त्याचे शुल्क, स्टोरेज व्यवस्था आणि विक्रीच्या अटी आधी तपासणे महत्त्वाचे आहे.
मग बहिणीसाठी काय निवडाल?
भावनिक आणि वापरता येणारी भेट हवी असेल तर दागिना, फिजिकल गोल्ड हवे असेल तर कॉइन आणि डिजिटल पद्धतीने सोन्यात पैसे गुंतवायचे असतील तर डिजिटल गोल्ड असा विचार करता येईल. यंदाच्या रक्षाबंधनाला फक्त महागडी भेट न देता बहिणीच्या पसंती आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन स्मार्ट गिफ्ट निवडा.




