Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • नितीन गडकरींचं ‘मी आता थकलोय’ वक्तव्य; निवृत्तीच्या चर्चांना उधाण, E20 वादाचा संबंध काय?
राजकारण

नितीन गडकरींचं ‘मी आता थकलोय’ वक्तव्य; निवृत्तीच्या चर्चांना उधाण, E20 वादाचा संबंध काय?

Nitin Gadkari Retirement
1
Nitin Gadkari Retirement: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ‘आता पूर्वीसारखं जास्त काम होत नाही’ या वक्तव्याने त्यांच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं आहे. नागपुरातील कार्यक्रमात नव्या पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त करत त्यांनी आपल्या आरोग्याचाही उल्लेख केला.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोलजवळील पारडसिंगा येथे एका कार्यक्रमात बोलताना गडकरींनी “आता पूर्वीसारखं जास्त काम करणं शक्य होत नाही” असं सांगत नव्या पिढीला संधी देण्याची गरज व्यक्त केली. त्यांच्या या विधानंतर गडकरी सक्रिय राजकरणातून बाजूला होण्याचा विचार करत आहोत का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

गडकरींनी आपल्या सार्वजनिक जीवनातील सुमारे तीन दशकांच्या प्रवासाचा उल्लेख केला. सुरुवातीच्या काळात पक्षाचं काम करताना आरोग्याची पर्वा न करता काम केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, आता आरोग्याला प्राधान्य देत असून योग आणि प्राणायामावर भर देत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

त्याचवेळी त्यांनी सत्तेपेक्षा चांगलं आरोग्य अधिक महत्वाचं असल्याचं सांगत ज्येष्ठांनी योग्य वेळी बाजूला होऊन नव्या पिढीला संधी द्यावी, असं मत व्यक्त केलं. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याचा अर्थ निवृत्तीचे संकेत असा लावला जात आहे. मात्र, गडकरींनी थेट राजकीय निवृत्तीची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा: Double Income, No Kids! DINK म्हणजे काय? तरुण जोडपी पालकत्वाचा निर्णय का टाळतायत?

E20 वादामुळे गडकरी बॅकफूटवर?

गडकरींच्या (Nitin Gadkari) या वक्तव्याची चर्चा सुरू असतानाच E20 म्हणजेच पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे. E20 इंधनामुळे वाहनांचं मायलेज, इंजिन आणि देखभाल खर्चाबाबत ग्राहकांकडून तक्रारी करण्यात आल्या आहेत. विरोधकांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि विशेषतः गडकरींना लक्ष्य केलं आहे.

मात्र, E २० धोरणाची आणखी आणि इंधनाशी संबंधित निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारीत येतात, तर गडकरींचे मंत्रालय रस्ते वाहतूक आणि महामार्गाशी संबंधित आहे. त्यामुळे E20 धोरणाशी आपला थेट संबंध नसल्याचं गडकरींनी यापूर्वी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, इथेनॉलच्या मुद्द्यावरून गडकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेले आरोपही राजकीय चर्चेचा विषय ठरले आहेत. मात्र, हे आरोप आणि गडकरींच्या ताज्या वक्तव्यामध्ये थेट संबंध असल्याचं त्यांनी स्वतः म्हटलेलं नाही.

त्यामुळे गडकरींचं “मी आता थकलोय” हे वक्तव्य खरोखरच निवृत्तीची पूर्वतयारी आहे की केवळ आरोग्य आणि नव्या पिढीला संधी देण्याच्या संदर्भातील विधान, हे स्पष्ट होण्यासाठी त्यांच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागलं आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts