• Home
  • लाईफस्टाईल
  • ख्रिसमस साठी लाल पांढरा आणि हिरवा रंग का वापरतात? जाणून घ्या त्यामागील लॉजिक
लाईफस्टाईल

ख्रिसमस साठी लाल पांढरा आणि हिरवा रंग का वापरतात? जाणून घ्या त्यामागील लॉजिक

Red, white and green Christmas decorations symbolizing tradition and festive spirit

Christmas Color Meaning : डिसेंबर महिन्यात येणार म्हणजे ख्रिसमस. हा जगभरात आनंद, प्रेम आणि शांततेचा संदेश देणारा सण मानला जातो. हा सण डिसेंबर महिन्यातील 25 या तारखेला साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मातील हा सण घरांची सजावट, ख्रिसमस ट्री , दिवे, लाईट्स, भेटवस्तू, केक , कॅरोल्स आणि खास करून सांताक्लॉज यामुळे अधिकच आकर्षित करतो. आणि संपूर्ण वातावरण आनंददायी करण्यास मदत करतो. पण तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल कि, ख्रिसमस ला लाला हिरवा आणि पांढरा हीच रंगसंगती का दिसते ? या रंगांना ख्रिसमस मध्ये जास्त मान्यता का आहे. जाणून घेऊया आजच्या या लेखात.

ख्रिसमस या सणासाठी धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. तसेच या सणासाठी वापरण्यात येणाऱ्या रंगांना देखील विशेष महत्व आहे.

लाल रंग

ख्रिसमससाठी वापरण्यात येणारा लाल रंग हा सर्वात प्रभावशाली उठावदार मानला जातो. या रंगाला ख्रिश्चन धर्मात धार्मिक महत्व आहे. जसे कि, येशू ख्रिस्तांचे बलिदान. लाल रंग येशू ख्रिस्तांनी मानवतेसाठी दिलेल्या बलिदानाचे प्रतीक मानले जाते. रक्ताचा रंग म्हणून हा लाल रंग श्रद्धा त्याग आणि प्रेम दर्शवतो. लाला रंग प्रेम, उब आणि आनंद दर्शवतो. तसेच हा रंग भावनांचे प्रतिनिधित्व करतो. एवढेच नाही तर आपण सांताक्लॉजला देखील लाल रंगाच्या पोशाखात पाहतो. दरवर्षी त्याच्या पोशाखाचा रंग बदलत नाही. तो लाल असतो.

हिरवा रंग

हिरव्या रंगाचा ख्रिसमसशी खोल संबंध आहे. हिरवा रंग हा निसर्ग, जीवन आणि आशेचे प्रतीक आहे. ख्रिसमस सणासाठी वापरले जाणारे ख्रिसमस ट्री देखील हिरव्या रंगात असते. हिवाळ्यात गळणारी पाने जीवनाची सातत्य आणि आशा दर्शवते. ख्रिश्चन धर्मात हिरवा रंग नवीन जीवनाचा, पुनर्जन्माचा आणि देवाच्या कृपेचे प्रतीक मानले जाते. थंडीच्या दिवसात येणारा ख्रिसमस हा सण हिरव्या रंगामुळे निसर्गासोबत जोडलेला आहे.

पांढरा रंग

पंधरा हा रंग शुद्धता आणि पवित्रच प्रतीक मानला जातो. त्यानुसार येशू ख्रिस्तांच्या पवित्र जन्माचे आणि निष्पापपणाचे प्रतीक मानले जाते. ख्रिसमस हा शांततेचा सण आहे. त्यामुळे पांढरा हा रंग समरसतेचे प्रतीक ठरतो. याशिवाय ख्रिसमस हा हिवाळ्यात येणार सण असल्यामुळे बर्फाच्छादित दृश्यांमुळे पांढरा हा रंग ख्रिसमस सोबत जोडला गेला आहे.

सजावटीतील रंगसंगती

ख्रिसम या सणासाठी सजावट करत असताना लाल हिरवा आणि पांढरा हे तीन रंग केंद्रस्थानी ठेवले जातात. या तीन रंगाचा वापर जास्तीत जास्त केला जातो. याशिवाय आधुनिक काळात गोल्ड, सिल्वर आणि ब्लु अशा रंगांचा देखील वापर या सणाला करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना