Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • घरगुती सिलिंडरचा काळाबाजार कराल तर ….! कुठे कुठे पडल्या धाडी?
एजुकेशन- जॉब

घरगुती सिलिंडरचा काळाबाजार कराल तर ….! कुठे कुठे पडल्या धाडी?

lpg cylinder
74

Domestic Cylinder black market : घरगुती सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यात धाडसत्र (Raid Spree) सुरु झालेय. राज्यातील अनेक जिल्ह्हात धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे घरगुती सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या वितरकांचे धाबे दणाणले आहेत. राज्यातील गोंदिया (gondiya),  नंदुरबार (nandurbar), सोलापूर (solapur), जालना (jalna), नाशिक (nashik) या जिल्ह्यात धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईत IOCL, HPCL आणि BPCL या नामांकित कंपन्यांचे सिलेंडर जप्त करण्यात आले.

हे ही वाचा: कुख्यात डॉन दाऊदचे नामोनिशाण मिटणार? कोकणातील वडिलोपार्जित जमीनीची लवकरच विक्री

गोंदिया व जालना शहरातही मोहीम

गोंदिया जिल्ह्यात तब्बल ४५ ठिकाणी छापा टाकला. यामध्ये १० सिलिंडर ताब्यात घेण्यात आले. जालनातील अंबडमध्ये धाडसत्र राबवले गेले. अंबड शहर,वडीगोद्री फाटा आणि पाचोड टोलनाका परिसरात छापेमारी करत पूरवठा विभागाने जवळपास १७ घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. नाशिकमधील भुसावळ येथेही छापा टाकण्यात आला. १९ हॉटेलवर छापे टाकत १२ घरगुती सिलेंडर जप्त करण्याची तहसील विभागाने कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्यातही कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांच्या आदेशानुसार दक्षता पथकांनी जिल्ह्यातील तब्बल ३० ठिकाणी छापे टाकले. सहा तालुक्यांमध्ये तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे.

करमाळ्यातही कारवाईचा बडगा

करमाळा तालुक्यातील जेऊर येथील इंद्रानगर भागात विजय बोराडे नावाच्या व्यक्तीकडे गॅस सिलेंडरचा अवैध साठा असल्याची खात्रीशीर माहिती पुरवठा विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे प्रशासकीय पथकाने त्या ठिकाणी तपासणी केली. यावेळी संबंधितांकडे कोणताही वैध परवाना आढळून आला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, हे सिलेंडर सुरक्षिततेचे नियम धाब्यावर बसवून आडव्या स्थितीत ठेवण्यात आले होते, ज्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता निर्माण झाली होती. साठा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई सोलापूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आणि करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

धुळे शहर आणि शिंदखेडमध्येही छापा

पुरवठा विभाग मार्फत धुळे शहरातील एकूण २४ हॉटेल्स खानावळी येथे तपासणी केली असता १५ घरघुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले तर शिंदखेडा मध्ये बारा सिलेंडर जप्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts