Top News

सूर्यदेव कोपले! विदर्भात उष्माघातामुळे ८ जणांचा मृत्यू

Heat stroke

Heat stroke : उन्हाळा म्हणलं कि प्रचंड ऊन, गर्मी आणि उष्णता हे साहजिक आहे . पण? यंदाच्या वाढत्या गर्मीमुळे व उष्णेतेच्या दाहामुळे जणू काय सूर्यदेव आपल्यावर कोपलेच आहेत की काय? असे वाटते. जोपर्यंत प्रचंड गर्मी व अंगची लाहीलाही करणारी गर्मी होती तोपर्यंत सगळं ठेका होत पण आता हा उन्हाळा आता प्राणघातक झाल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. आपल्या वाढत्या सूर्याच्या अंशासाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भता अनेकांनी आपला प्राण या उष्माघातामुळे गमावला आहे.

या वर्षीचा उष्णतेचा कहर संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणारा दिसतोय. पण विदर्भ भागात या उष्णतेने स्तोम माजवल्याचे दिसत आहे. विदर्भात वाढत्या तापमानामुळे जीवघेण्या सामना उष्मघाताचा सामना लोकांना करावा लागत आहे. आत्तापर्यत तब्बल ८ लोकांच मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे. या गोष्टीमुळे स्थानी नागरिकात काळजीचे वातावरण निर्मण झाले आहे. संपूर्ण राज्याची उष्णता एकीकडे व फक्त विदर्भाची उष्णता एकीकदे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण विदर्भाचा उष्णेतेचा पारा उच्चनक गाठत असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हाच्या काहारामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. काही काही जिल्ह्याना तर रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे. . विशेषतः चंद्रपूर, नागपूर, अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

8 जणांचा मृत्यू

वाढत्या उष्णतेचा फटका आता थेट नागरिकांच्या जीवावर उठताना दिसत आहे. विदर्भात उष्माघातामुळे मृत्यूंच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली असून, आतापर्यंत तब्बल 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रचंड तापमान, अंगाची लाहीलाही करणारे ऊन आणि उकाड्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेषतः वृद्ध, लहान मुले आणि उन्हात काम करणाऱ्या मजुरांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

काही जिल्ह्याना रेड अलर्ट

विदर्भातील उष्णतेचा वाढलेल्या काही गावांना व शहरांना रेड अलर्ट घोधित करण्यात आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात देशातील सर्वात जास्त तब्बल ४७.७ डिग्री सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आलेल आहे. यामुउले नागरिकांना सतर्कतेचा आवाहन देऊन घरातून बाहेर न पाडण्याचे आव्हान दिले आहे.

उष्माघात टाळण्यासाठी काय करावे

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेषतः दुपारच्या वेळेत बाहेर काम करणारे, वृद्ध व्यक्ती आणि लहान मुलांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. उष्माघात टाळण्यासाठी शरीर हायड्रेट ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या तसेच लिंबूपाणी, ताक, नारळपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या.दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो उन्हात बाहेर जाणे टाळावे. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्रीचा वापर करावा. हलक्या रंगाचे आणि सैल सूती कपडे परिधान केल्यास शरीराला थंडावा मिळतो. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळून हलका आहार घ्यावा. उष्माघाताची लक्षणे दिसल्यास — जसे चक्कर येणे, डोकेदुखी, उलट्या, जास्त घाम येणे किंवा शरीराचे तापमान अचानक वाढणे  तातडीने सावलीत विश्रांती घ्यावी आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts