Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मनोज जरांगेच्या सरकारकडून १३ पैकी १२ मागण्या मान्य; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? जाणून घ्या A टू Z माहिती
महाराष्ट्र

मनोज जरांगेच्या सरकारकडून १३ पैकी १२ मागण्या मान्य; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? जाणून घ्या A टू Z माहिती

Manoj Jarange Patil
5
Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १३ पैकी १२ मागण्या मान्य केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Maharashtra CM Devendra Fadnavis Said 12 of Manoj Jarange Patil’s Demands Have Been Accepted: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. जरांगे पाटील यांनी मांडलेल्या १२ मागण्यांपैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या असून, एका मागणीसमोर कायदेशीर अडचण असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पुण्यातील गणेश मंडळांना भेट देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत भाष्य केले.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आंदोलनाची भूमिका यापूर्वीच त्यांनी स्पष्ट केली असून, त्यांच्या मुंबईतील संभाव्य आंदोलनामुळे गणेशोत्सवाच्या काळात गर्दी आणि वाहतुकीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री? (Devendra Fadnavis Statement)

फडणवीस यांनी सांगितले की, जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक (Maratha Reservation News) असून चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवण्याची तयारी आहे. त्यांच्या १३ मागण्यांपैकी १२ मागण्यांवर सरकारने (12 Demands Accepted) मान्यता दर्शवली आहे. मात्र, उर्वरित एका मागणीच्या बाबतीत कायदेशीर अडचणी (Manoj Jarange Latest News) असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जरांगे पाटील यांचे आंदोलन अनेक दिवसांपासून सुरू असल्याने त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होत असल्याचे फडणवीस म्हणाले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे आणि त्यानंतरही आपल्या मागण्यांसाठी पुढील भूमिका घेता येईल, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

सध्या पुणे आणि मुंबईसह राज्यातील विविध भागांत गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर येत असल्याने आंदोलनामुळे  उत्सवाच्या व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. सरकार चर्चेसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Maratha Protest 2026)

पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांसमोर चिंता

राज्यात काही भागांत पावसाने मोठी उघडीप दिल्याने शेतीपिकांवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने परिस्थितीचा आढावा घेतला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

राज्यात सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाला होता. मात्र, त्यानंतर पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक भागांत शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. या परिस्थितीवर मंत्रिमंडळाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

एनडीआरएफच्या निकषांनुसार ५ ऑक्टोबरनंतरच अंतिम स्वरूपाचे सर्वेक्षण करता येते. मात्र, त्यापूर्वीच राज्य सरकारकडून प्राथमिक पातळीवर परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. राज्यातील ज्या भागांत शेतकऱ्यांना पावसाच्या खंडामुळे नुकसान सहन करावे लागत आहे, त्या ठिकाणी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts