Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • धक्कादायक! तिच्यावर 9 जणांकडून 3 दिवस अत्याचार; 10 शिकणाऱ्या मुलीसोबत काय घडलं?
गुन्हा

धक्कादायक! तिच्यावर 9 जणांकडून 3 दिवस अत्याचार; 10 शिकणाऱ्या मुलीसोबत काय घडलं?

Telangana Minor Rape Case
2
Telangana Minor Rape Case: तेलंगणातून एक बातमी समोर आलीय, जी पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल ही माणसं की हैवाणं…कारण एक मुलगी जी फक्त दहावीत शिकते, पण या मुलीवर तब्बल 9 जणांनी अत्याचार केला आणि देश पुन्हा हादरला, या मुलीसोबत नेमकं काय घडलं? माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या भयानक स्टोरीचा आढावा आपण जाणून घेणार आहोत.

तेलंगणाच्या मेदचल-मलकाजगिरी जिल्ह्यातील अलवाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका १० वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर (Class 10 student rape) ९ जणांनी मिळून ३ दिवस सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अत्यंत अमानुष आणि गंभीर प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळलीय, आपल्या देशातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अलवाल पोलिसांनी पीडितेच्या आणि तिच्या कुटुंबीयांच्या तक्रारीची त्वरित दखल घेत युद्धपातळीवर कारवाई सुरू केली असून, आतापर्यंत मुख्य संशयितांसह ८ आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे, तर या गुन्ह्यातील एक फरार आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसून त्याच्या शोधासाठी पोलीस प्रशासनाने विविध पथके तैनात केली आहेत. (Telangana Crime News)

हेही वाचा: 17 सप्टेंबर का आहे मराठवाड्यासाठी खास? जाणून घ्या इतिहास आणि वारसा

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार

या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर तपास करत असताना पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गुन्ह्याची पार्श्वभूमी अत्यंत नियोजनबद्ध आणि क्रूर पद्धतीने रचण्यात आली होती. आरोपींनी पीडित अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यासाठी तिच्याच एका ओळखीच्या पुरुष मित्राचा वापर केला. या पुरुष मित्राने पीडितेला आमिष दाखवून किंवा फसवून आरोपींच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी पीडितेला तीन दिवसांपर्यंत बेपत्ता ठेवले होते.

७२ तासांच्या कालावधीत

या ७२ तासांच्या कालावधीत नराधमांनी तिला विविध निर्जन आणि वेगवेगळ्या ठिकाणी डांबून ठेवले होते, जिथे तिच्यावर वारंवार सामूहिक लैंगिक अत्याचार करण्यात आला. पीडितेने दिलेल्या जबाबानुसार या तीन दिवसांत तिच्या असहायतेचा गैरफायदा घेत नऊ जणांनी तिच्यावर अमानुष अत्याचार केले. या छळातून कशाबशा प्रकारे स्वतःची सुटका करून घेतल्यानंतर पीडित मुलगी अत्यंत गंभीर अवस्थेत तिच्या घरी पोहोचली आणि तिने घडलेला सर्व प्रकार आपल्या पालकांना सांगितला. त्यानंतर त्यांच्याही पायाखालची वाळू सरकली, सगळीकडे एकट सन्नाट पसरला, यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ अलवाल पोलीस ठाणे गाठून न्यायाची मागणी करत अधिकृत तक्रार दाखल केली.

अत्याचाराची कायदेशीर नोंद

पीडितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास तात्काळ हाती घेतला. पोलिसांनी पीडितेवर झालेल्या अत्याचाराची कायदेशीर नोंद करत सर्व नऊ आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता आणि प्रामुख्याने बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा म्हणजेच पोक्सो कायद्यांतर्गत अत्यंत कडक कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेगवेगळ्या भागांत छापे टाकून अवघ्या काही तासांतच आठ आरोपींना बेड्या ठोकल्या.

गुन्ह्यात वापरलेली वाहने किंवा इतर पुराव्यांचा शोध

अटक करण्यात आलेल्या आरोपींची पोलीस कसून चौकशी करत असून गुन्ह्यात वापरलेली वाहने किंवा इतर पुराव्यांचा शोध घेतला जात आहे. मात्र, या प्रकरणातील नववा आरोपी पोलीस कारवाईची खबर लागताच परिसरातून फरार झाला असून, त्याला पकडणे हे सध्यातरी पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले आहे. स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार फरार आरोपीच्या संभाव्य ठिकाणांवर पाळत ठेवण्यात आली असून, शेजारील जिल्ह्यांमध्येही पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि त्याला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

तेलंगणासह देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत

अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या अघोरी आणि पाशवी कृत्यामुळे तेलंगणासह देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका शाळकरी मुलीचे तिच्याच मित्राच्या मदतीने अपहरण केले जाणे आणि त्यानंतर तीन दिवस तिच्यावर अत्याचार होणे, यावरून महिला व बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर बनला आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होते. स्थानिक नागरिकांनी आणि विविध सामाजिक संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, अटक करण्यात आलेल्या सर्व नराधमांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी लावून धरली आहे.

शाळा-कॉलेजच्या परिसरात पोलिसांची गस्त

तसेच अशा घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक पावले उचलावीत आणि शाळा-कॉलेजच्या परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी, अशीही मागणी जोर धरत आहे. अलवाल पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तांत्रिक आणि वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे अधिक सखोल तपास करत असून, पीडितेची वैद्यकीय तपासणी पूर्ण करण्यात आली आहे आणि तिला आवश्यक ते समुपदेशन व वैद्यकीय उपचार पुरवले जात आहेत. त्यामुळे अशा नराधमांना आता कडक शासन करून यांना कायमचा आळा खालण्यासाठी एक उदाहरण माडलं जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts