Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • PMP चा वेळकाढूपणा उघड, जवळपास दीडशे बस दुरुस्ती अभावी एका जागेवर उभ्या
Pune

PMP चा वेळकाढूपणा उघड, जवळपास दीडशे बस दुरुस्ती अभावी एका जागेवर उभ्या

विदर्भात पुढील ३ ४ दिवस मुसळधार पावसाची शक्यता येलो अलर्ट जारी 2025 09 29T184144.789
123

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) स्वमालकीच्या बसच्या सुट्या भागांची खरेदी होत नसल्याने दुरुस्तीअभावी दीडशे बस अनेक दिवसांपासून बंद आहेत. यामुळे प्रत्यक्ष मार्गावर धावणाऱ्या स्वमालकीच्या बसची संख्या एकदम कमी झाली असून, ‘पीएमपी’ला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी बहुसंख्य वाटा खासगी ठेकेदारांच्या बससाठी द्यावा लागत आहे.

150 बस एका जागेवर उभ्या

गेल्या काही वर्षांपासून ‘पीएमपी’च्या ताफ्यातील स्वमालकीच्या बसची संख्या सातत्याने कमी झाली असून सध्या दररोज मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये स्वमालकीच्या बसची संख्या अवघी सहाशेच्या दरम्यान आहे. त्यातही गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून 150 बस या दुरुस्तीच्या अभावाने बंद पडून आहेत. कारण, या बसच्या दुरुस्तीसाठी आवश्यक सुट्या भागांची खरेदीच होत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

प्रशासनाचा वेळकाढूपणा

खरतर, पीएमपीच्या मालकीच्या बसची दुरुस्ती महामंडळाच्या कार्यशाळेतच केली जाते. परंतु, सध्या सुट्या भागांची उपलब्धता नसल्याने या बस दुरुस्तीअभावी जागेवरच थांबून आहेत. कारण, यासेच्या दुरुस्तीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुटे भाग लागणार असल्याने त्याची खरेदी प्रक्रिया करण्यासाठी तातडीने निर्णय घेतला जाणे आवश्यक असताना, पीएमपी प्रशासनाकडून वेळकाढूपणा होत असल्याचे समोर येत आहे.

संचालक पद रिक्त, अध्यक्षव्यवस्थापकीय संचालकांना वेळ नाही

याशिवाय, पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक पद रिक्त ठेवण्यात आले असून, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांकडे सुट्या भागांच्या खरेदीला निधी मंजूर करण्याकरिता वेळ मिळत नसल्याने,यामुळे होणारे नुकसान ‘पीएमपी’ला सहन करावे लागते आहे. कारण, सध्या दीडशेहून अधिक बस बंद असल्याने पीएमपीला उत्पन्नातून मिळणारा महसूल ठेकेदारांच्या बसचे प्रति किलोमीटर भाडे देण्यातच खर्च होत आहे. दरम्यान, ‘पीएमपी’कडून बसचे सुटे भाग खरेदी करण्यास का विलंब होतोय? याचे कोणतेही स्पष्टीकरण दिले जात नाही. तसेच, या विषयाबबत वारंवार संपर्क साधूनही ‘पीएमपी’च्या एकही वरिष्ठ अधिकारी याविषयी भाष्य करण्यास नसल्याचं समोर येत आहे. तर नेमकं पीएमपी प्रशासन कशात व्यस्त आहे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पीएमपी प्रशासनाकडे असणाऱ्या बस किती?

  • ‘पीएमपी’च्या ताफ्या असणाऱ्या एकूण बस —-२,०२५
  • ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या बस —-७६५
  • ठेकेदारामार्फत चालविल्या जाणाऱ्या बस —-१,२८५
  • ‘पीएमपी’च्या दुरुस्ती अभावी बंद बस —-१५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts