Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • बिगबॉस 19 ची ट्रॉफी जिंकणारा गौरव खन्ना आहे तरी कोण? जाणून घ्या जिंकलेली किती रक्कम घरी घेऊन जाणार
मनोरंजन

बिगबॉस 19 ची ट्रॉफी जिंकणारा गौरव खन्ना आहे तरी कोण? जाणून घ्या जिंकलेली किती रक्कम घरी घेऊन जाणार

Ranveer Singh meeting Hollywood actor Terry Cruise at Abu Dhabi Grand Prix 2025, sharing wishes for his upcoming movie Dhurandhar

Bigg Boss 19 winner Gaurav Khanna : ऑगस्ट महिन्यात बिग बॉस 19 हा रिऍलिटी शो सुरु झाला होता. आता 7 डिसेंबरला या शो ची सांगता करण्यात आली. ग्रँड फिनाले पर्यंत गेलेल्या 5 स्पर्धकांपैकी बिग बॉस 19 ची ट्रॉफी कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. आणि कोणाला वाटत होतं प्रणित मोरेला ही ट्रॉफी मिळावी तर काहींना वाटत होते कि, गौरव तर काहींना तान्या मित्तल जिंकणार असे वाटत होते. परंतु शेवटी फरहाना आणि गौरव यांच्यात चुरस रंगलेली असताना गौरव खन्नाच्या नावावर ही बिग बॉस 19 ची ट्रॉफी गेली.

बिग बॉस 19 मध्ये ग्रँड फिनाले पर्यंत गौरव खन्ना, फरहाना भट्ट, प्रणित मोरे, अमाल मलिक आणि तान्या मित्तल हे पाच स्पर्धक पोहोचले होते. त्यानंतर4जण एलिमिनेट होत अखेरच्या दहा मिनिटांमध्ये गौरवला अधिक मतं मिळाली आणि बिग बॉस 19 च्या ट्रॉफीवर गौरवने नाव कोरले. गौरवला बिग बॉस 19 ची चमचमणारी ट्रॉफी, बक्षीस म्हणून 50 लाख रुपये मिळाले. आता त्याला मिळालेल्या बक्षिसाच्या रक्कमेवर टॅक्स भरावा लागणार आहे. त्यानुसार त्याला 50 लाखातून फक्त 34 लाख रुपये घरी घेऊन जाता येणार आहे.

हे ही वाचा : स्मृतीसोबतच लग्न मोडल्यानंतर पलाशने दिला थेट कायदेशीर कारवाईचा इशारा.॥

बिग बॉस 19 जिंकताच सोशल मीडियावर पोस्ट

बिग बॉस 19 शो संपल्यानंतर गौरव खन्ना यांच्या टीम कडून पहिली पोस्ट शेअर करण्यात आली. या पोस्ट मध्ये पत्नीसोबतचा फोटो शेअर तीन महिन्यांचा प्रवास अखेर संपला.. आणि शेवट काय होता! ट्रॉफी घरी आली आहे. जीके काय करणार? आणि जसं की मी नेहमी म्हणत आलो की, जीके सर्वांसाठी ट्रॉफी घरी आणणार. त्याने असंच केलं. हा संपूर्ण प्रवास खूप रंजक आणि उत्साहपूर्ण होता. हा त्या प्रत्येक व्यक्तीचा विजय आहे, ज्याने गौरववर विश्वास ठेवला, मत दिलं आणि त्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहिले. हा फक्त एका ट्रॉफीचा जल्लोष नाही. तर हा विश्वास आणि प्रेमाचा जल्लोष आहे.

कोण आहे गौरव खन्ना

बिग बोस 19 विजेता अभिनेता गौरव खन्नाने दोन दशकांपासून जास्त काळ टीव्ही इंडस्ट्रीमध्ये गाजवला आहे. त्याने त्याच्या करियरमध्ये सुरुवातीला आयटी फर्म मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केले आहे. त्यांनी जाहिरातींमध्ये देखील काम केले असून त्याने भाभी या टीव्ही शो पासून सुरुवात केली. त्यानंतर कुमकुम : एक प्यारा सा बंधन, मेरी डोली तेरे अंगना , जीवनसाथी हमसफर जिंदगी के , सीआयडी , प्रेम या पहेली : चंद्रकांता या सारख्या सिरीयल मध्ये काम केले आहे. त्यानंतर प्रसिद्ध सिरीयल अनुपमा मध्ये त्याने अनुज कपाडियाची भूमिका साकारली होती. या शोसाठी गौरवला सर्वोत्कृष्ट प्रमुख अभिनेत्याचा भारतीय टेलि पुरस्कार देखील मिळाला होता. आता बिग बोस 19 ची ट्रॉफी त्याने गाजवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts