• Home
  • मनोरंजन
  • या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार बिगबॉस मराठी सिझन 6; 21 ते 55 वयोगटातील सदस्य होणार सहभागी
मनोरंजन

या तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार बिगबॉस मराठी सिझन 6; 21 ते 55 वयोगटातील सदस्य होणार सहभागी

Bigg Boss Marathi season 6

Bigg Boss Marathi season 6  : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रेक्षकांच्या आवडीचा आणि सर्वाधिक चर्चेत असलेला रिऍलिटी शो म्हणजे बिग बॉस मराठी. हा शो आता पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या बिग बॉस मराठी सिझन 6 कोण होस्ट करणार हा प्रश्न प्रत्येकाला पडला होता. आता देशाचा सुपरस्टार, अभिनेता रितेश देशमुख हा नवीन सिझन होस्ट करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

बिग बॉस मराठी सिझन 6 हा शो 11 जानेवारीला कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टार वर येणार आहे. यंदा ‘बिग बॉस मराठी’ चे हाऊस नवीन रूपात, नव्या ढंगात आपल्याला दिसणार आहे. सोशल मीडियावर कलर्स मराठी या अकाउंटवर पोस्ट शेअर केली असून या पोस्ट मध्ये “दार उघडणा, नशिबाचा गेम पालटणार” असे ब्रीदवाक्य या बिग बॉसच्या घरावर लिहिलेले दिसत आहे.

काय आहे X वरची पोस्ट

सोशल मीडियावर कलर्स मराठी या अकाऊंटवरून बिग बॉस मराठी सिझन 6 ची नवीन पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्ट मध्ये रिऍलिटी शो रिलीज होण्याची देखील तारीख नमूद करण्यात आली आहे. सज्ज व्हा… महाराष्ट्रात मनोरंजनाचे वादळ येतेयफक्त 5 दिवसात….! बिग बॉस मराठी 11 जानेवारीपासून दररोज रात्री 8 वाजता. फक्त कलर्स मराठी आणि jiohotstar वर. असा आशय या पोस्टध्ये देण्यात आलाहे.

सोशल मीडियावर चर्चा

बिग बॉस मराठी सिझन 6 प्रेक्षकांच्या भेटीला येण्यापूर्वी सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या सिझन मध्ये कोण नवीन सदस्य जुळले जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असून अनेकांची नावे समोर आली आहे. तर काही जणांच्या नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे देखील समजले आहे. या सदस्यांच्या अंगातील मस्ती जिरवण्यासाठी आपला लाडका भाऊ रितेश देशमुख सज्ज आहे.

हे ही वाचा : व्हॅलेंटाईनच्या मुहूर्तावर येणार ‘लग्नाचा शॉट’; प्रियदर्शनी-अभिजितची जोडी करणार धूम

काय म्हणाले रितेश देशमुख

हा सिझन होस्ट करण्याबाबत रितेश देशमुख म्हणाले कि, बिग बॉस मराठीचे घर म्हणजे नवीन वळण आणि नवीन आव्हान. परत एकदा या शो चे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. यंदा कुठलं दार कुणाचं नशीब उघडेल, हे कुणालाच माहीत नसून या शोची खरी मजा म्हणजे सदस्यांमधले लपलेले पैलू प्रेक्षकांसमोर आणणे हे आहे. यंदाच्या सीझनमध्ये राडा, धुरळा, भावना, मस्ती सगळं काही प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. बिग बॉसच्या सहाव्या सीझनसाठी सज्ज राहा, कारण यंदा ‘बिग बॉस मराठी’ अधिक बेधडक, अनपेक्षित आणि अगदी अस्सल मराठमोळा असणार आहे.”

यंदा बिग बॉसच्या घरात वेगवेगळ्या क्षेत्रातील 16 पेक्षा जास्त लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बॉग बोसचे सदस्य म्हणून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या शो मध्ये प्रत्येक आठवड्याला किमान एका स्पर्धकाचं नामांकन करण्यात येणार आहे. आणि अंतिम फेरीपर्यंत टिकणारा स्पर्धक ‘बिग बॉस मराठी’ सिझन 6 चा विजेता ठरेल. या बिग बॉस मराठी सिझन 6 मध्ये 21 ते 55 वयोगटातील विविध विचारसरणी असलेले सदस्य बघायला मिळणार असल्याचे दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts