• Home
  • महाराष्ट्र
  • केतनचा मृतदेह घरी आणताच खटकली ‘ही’ बाब; वडिलांच्या खुलाशाने वाढलं गूढ, नेमकं काय घडलं?
Pune

केतनचा मृतदेह घरी आणताच खटकली ‘ही’ बाब; वडिलांच्या खुलाशाने वाढलं गूढ, नेमकं काय घडलं?

Ketan Agarwal Death Case at Lohagad Fort

Ketan Agarwal Death Case at Lohagad Fort: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी केतन अग्रवाल यांचा दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात मानला जात असला, तरी तपासात समोर आलेल्या माहितीनुसार त्यांच्या होणाऱ्या पत्नी सिया गोयलवर हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी ट्रेकिंगदरम्यान एका तरुण व्यावसायिकाचा झालेला मृत्यू सुरुवातीला अपघात मानला जात होता. मात्र तपासात समोर आलेल्या माहितीनंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले असून मृत्यूमागे कट रचल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृत व्यावसायिक केतन अग्रवाल (Ketan Agarwal) यांचा विवाह लवकरच सिया गोयल हिच्याशी होणार होता. केतनचा मृतदेह घरी आणण्यात आला तेव्हा आई-वडील, नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य दुःखाने व्याकूळ होऊन रडत होते. मात्र, त्या वेळी सियाच्या चेहऱ्यावर कोणतीही भावनिक प्रतिक्रिया दिसून आली नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. अनेकांनी ती धक्क्यात (शॉकमध्ये) असल्यामुळे शांत असेल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या काही धक्कादायक माहितीनंतर या प्रकरणाने वेगळेच वळण घेतले. प्रेमसंबंध, विश्वासघात आणि कथित पूर्वनियोजित कट अशा विविध अंगांनी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

हेही वाचा: सलग दुसऱ्या दिवशी पुणे, मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पुढील 3 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा, या भागांना धोका

Ketan Agarwal Death Case:

केतनच्या वडिलांनी व्यक्त केला संशय

केतन यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्याचे समोर आले आहे. केतन यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मुलाचा मृतदेह घरी आणल्यानंतर काहींची वागणूक त्यांना असामान्य वाटली. त्या वेळी त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही, मात्र नंतरच्या तपासात समोर आलेल्या माहितीमुळे त्यांच्या शंका अधिक बळावल्या.

त्यांनी असेही सांगितले की, काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वैयक्तिक संबंधांमुळे हे प्रकरण गुंतागुंतीचे बनले असून पोलिसांनी सर्व बाबींची सखोल चौकशी करावी, अशी त्यांची मागणी आहे.

Ketan Agarwal Death Case
Ketan Agarwal Death Case

तपासात समोर आले महत्त्वाचे धागेदोरे

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या काही दिवस आधी केतन आणि सिया लोहगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. त्यानंतर वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा किल्ला परिसरात गेले. त्या वेळी सियाने केतनला साप असल्याचे सांगून घाबरवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या वेळी कोणतीही अनुचित घटना घडली नाही, असे तपासात समोर आले आहे.

यानंतर पुन्हा ट्रेकिंगदरम्यान फोटो काढताना केतन दरीत कोसळल्याची घटना घडली. काही सूत्रांच्या माहितीनुसार, या वेळी तिथे आणखी एक व्यक्ती उपस्थित असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही व्यक्ती कॅप किंवा हुडी घातलेली असून ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे घटनेच्या वेळी नेमके काय घडले, हा अपघात होता की त्यामागे काही अन्य कारण आहे, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

दरम्यान, पोलिस चौकशीत संबंधित व्यक्तींची विचारपूस करण्यात आली असून त्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. तपास यंत्रणांकडून सर्व पुरावे, मोबाईल डेटा आणि साक्षीदारांचे जबाब यांची छाननी केली जात आहे.

या प्रकरणातील चौकशीत समोर आलेल्या माहितीवरून वैयक्तिक कारणांमुळे हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांकडून अधिकृत निष्कर्ष जाहीर करण्यात आलेला नाही.

 

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts