• Home
  • गुन्हा
  • सियाचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा? न्यायालयीन कोठडीनं साधलं!
Pune

सियाचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा? न्यायालयीन कोठडीनं साधलं!

सिया गोयल

Ketan Agrawal Case: केतन अग्रवाल हत्याकांडामुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर देश हादरला आहे..या हत्या प्रकरणात केतनची होणारी पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांना पोलिसांनी अटक केलेली आहे..पण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सियाचा काही माज उतरताना दिसत नाहीये…सिया माध्यमांसमोर मधलं बोट दाखवत अश्लील वर्तन करताना दिसते..आज दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं…यावेळी सरकारी वकील आणि पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली…पण कोर्टाने ही मागणी फेटाळून लावत आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली…त्यामुळे आता सिया गोयलच्या जामिनाचा मार्ग मोकळा झालाय की काय असा प्रश्न निर्माण झालाय?

सिया आणि चेतनने लोहगड किल्ल्यावरून चेतनला ढकलून ठार केल्याने पोलिसांनी दोघांनाही अटक केलीये…त्यानंतर आता दोघांची चौकशी सुरु असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे…आता आज दोन्ही आरोपींची कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्यांना कोर्टात हजर केलं होतं.. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी आणि सरकारी वकिलांनी कोर्टाला सांगितले की, पोलिसांनी आतापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा, सराव केलेल्या ठिकाणाचा पंचनामा, तसेच आरोपींनी केतनचे पासपोर्ट ज्या ठिकाणी फाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, त्या जागेचाही पंचनामा पूर्ण केला आहे.. याशिवाय आरोपींचे गुन्ह्याच्या वेळचे कपडे जप्त करण्यात आले असून त्यांच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटाही पोलिसांनी रिकव्हर केला आहे…पण आरोपींच्या मोबाईलमधून जो डेटा रिकव्हर झाला आहे, त्यामध्ये त्यांनी एकमेकांशी संवाद साधताना सामान्य भाषेऐवजी एका ‘सांकेतिक भाषेचा’ म्हणजेच कोडेड लँग्वेजचा आणि टोपणनावांचा वापर केलाय.. हा सांकेतिक डेटा नेमका काय आहे, त्यांनी हे कोड कशासाठी वापरले, याचा उलगडा करण्यासाठी आणि या संपूर्ण हत्येच्या भयंकर कटात त्यांच्यासोबत आणखी काही जवळच्या व्यक्तींचा सहभाग आहे का? याचा शोध घेण्यासाठी आरोपींची आणखी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी कोर्टात करण्यात आली…

सिया गोयल

मात्र, सिया गोयलचे वकील विपुल दूशिंग यांनी याला कडाडून विरोध केला. सिया पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करत आहे आणि तिचा मोबाईलही जप्त झाला आहे. त्यामुळे केवळ सांकेतिक चिन्हांच्या पडताळणीसाठी पुन्हा पोलीस कोठडी मागणे कायद्यात बसत नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला… चेतन चौधरीच्या वकिलानेही, पोलीस केवळ ‘काहीतरी हाती लागेल’ या शक्यतेवर कोठडी मागत असल्याचा आक्षेप घेतला… दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी पोलिसांची मागणी फेटाळली आणि दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली.

हेही वाचा : आर्थिक बदलांचा डोस! १ जुलैपासून लागू झाले ५ मोठे नियम; जाणून घ्या

यावेळी सरकारी वकिलांनी नार्को टेस्टची मागणी केली…पण आरोपींच्या वकिलांनी विरोध केला… यावर न्यायाधीशांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत सांगितले की, नार्को टेस्ट करण्यासाठी आरोपींची स्वतःची लेखी संमती असणे अनिवार्य आहे, त्याशिवाय कोर्ट परवानगी देऊ शकत नाही…त्यामुळे आरोपींची संमती नसल्यामुळे आता सियाची नार्को टेस्ट होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

कोर्टात सुनावणी झाल्यानंतर सिया आणि चेनतच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे… अधिक तपासासाठी योग्य कारण नसल्यामुळे न्यायालयाने या दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली..पोलिसांनी, आरोपींची नार्को टेस्टची मागणी केली होती.. पण त्याला एक प्रकिया आहे….जर स्वतः हा आरोपी त्यासाठी तयार असेल तर टेस्ट केली जाते… पण या केसमध्ये आरोपी त्यासाठी तयार नव्हते, असं चेतनच्या वकिलांनी म्हटलं…

आरोपी सियाच्या वकिलाने देखील सुनावणी झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे…आज आरोपींची पोलिसांनी तीन दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती…कोर्टाने ती मान्य केली नाही..त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे, असं सियाच्या वकिलांनी म्हटलं…

सियाचा बाहेर का?

आता दोन्ही आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाल्यामुळे कायदेशीर वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये एकच चर्चा सुरू आहे की, सिया गोयल आता जेलमधून बाहेर येणार का? तर जोपर्यंत आरोपी पोलीस कोठडीत असतो, तोपर्यंत त्याला जामीन अर्ज करता येत नाही किंवा तो मंजूर होत नाही… मात्र, आता कोर्टाने आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत केल्यामुळे, सियाच्या वकिलांना आता रीतसर जामीनासाठी न्यायालयात अर्ज करण्याचा कायदेशीर अधिकार मिळाला आहे… सियाचे वकील लवकरच जामीनासाठी अर्ज करू शकतात..

मात्र सरकारी वकील न्यायालयात सियाच्या जामीनाला तीव्र विरोध करु शकतात.. सियाने आधीच केतनचा पासपोर्ट फाडून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.. तसेच मोबाईलमधील डेटा डिलीट केला होता. जर ती जामीनावर बाहेर आली, तर ती साक्षीदारांवर दबाव आणू शकते किंवा उर्वरित तांत्रिक पुराव्यांशी छेडछाड करू शकते, हा मुद्दा सरकारी वकील कोर्टासमोर प्रकर्षाने मांडतील…

कालच सिया गोयल ने पोलिसांच्या ताब्यात असताना माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर जे अश्लील वर्तन केलं, ते सुद्धा तिच्या विरोधात जाऊ शकतं. आरोपीच्या मनात गुन्ह्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही आणि तिची मानसिकता गुन्हेगारी स्वरूपाची आहे, हे दाखवण्यासाठी सरकारी पक्ष या वर्तनाचा दाखला कोर्टात देऊ शकतो.

थोडक्यात सांगायचे तर, कोर्टाने पोलीस कोठडी नाकारल्यामुळे सिया गोयलच्या वकिलांना जामीनासाठी प्रयत्न करण्याची कायदेशीर संधी नक्कीच मिळाली आहे. मात्र, हा पूर्वनियोजित कट रचून केलेला क्रूर खून असल्यामुळे आणि आरोपींनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यामुळे, सिया गोयलला इतक्यात जामीन मिळणे अत्यंत कठीण वाटत आहे. एका निष्पाप तरुणाचा विश्वासघाताने जीव घेणाऱ्या आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या सिया गोयलला जेलची हवा खावीच लागणार की ती पळवाटा शोधून बाहेर येणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts