Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • भाजपच्या मदतीनं स्टॅलिन सीएम बनणार? तामिळनाडूत ‘मविआ’ पॅटर्न?
Top News

भाजपच्या मदतीनं स्टॅलिन सीएम बनणार? तामिळनाडूत ‘मविआ’ पॅटर्न?

Stalin BJP support

Stalin BJP support : तामिळनाडूत पुन्हा एकदा एमके स्टॅलिन यांचा DMK पक्ष सत्तेत येणार असल्याची चर्चा सुरु आहे… भाजप स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे.. त्यामुळे तामिळनाडूचे राज्यपाल विजय थलपती यांच्याकडे बहुमत मागत वेळकाढूपाण करत असल्याची टीका होत आहे… 2021 च्या तामिळनाडू विधानसभेत DMKने बहुमत सत्ता मिळवली होती.. मात्र यावेळी DMK ला पराभवचा सामना करावा लागला आहे.. DMK चे फक्त 59 आमदार निवडून आले आहेत.. त्यामुळे एमके स्टॅलिन यांना मुख्यमंत्री पदावरुन पाय उतार व्हावं लागलं आहे.. आता एमके स्टॅलिन यांना पुढील पाच वर्ष विरोधात बसावं लागणार आहे..

मात्र यावेळी भाजप मोठी खेळी करत भाजपचा कट्टर विरोधक अशी ओळख असणाऱ्या स्टॅलिन यांना तामिळनाडूत सत्तेत आणणार असल्याची चर्चा आहे.. मात्र अशी चर्चा का सुरु आहे? स्टॅलिन यांनी पीएम मोदींना आणि भाजपला नेहमीच विरोध केला आहे.. कोणत्याही मुद्द्यावरुन स्टॅलिन मोदी सरकारला घेरताना दिसतात.. मात्र एवढ्या कट्टर विरोधक असणाऱ्या स्टॅलिन यांना भाजप सत्तेत का आणण्याचा प्रयत्न करेल? इंडिया आघाडीतील विरोधी पक्ष असणाऱ्या DMK पासून भाजपला काय फायदा होणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओतून पाहूयात..

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर

महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर लोकसभेत नामंजूर झालं आहे.. भाजपने लोकसभेत हे विधेयक आणल्यानंतर विरोधकांनी याला विरोध केला.. महिला आरक्षणच्या नावाखाली लोकसभेत आणि विधानसभेतल्या जागा वाढवल्या जाणार आहेत.. यामुळे उत्तर भारतातील राज्यांना मोठा फायदा होणार आणि दक्षिण भारतातील राज्यांना याचा मोठा तोटा सहन करावा लागणार, असं म्हणत विरोधकांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं..

घटनादुरुस्तीच्या बाजूनं 298 मतदान झालं

लोकसभेत या घटनादुरुस्ती विधेयकावर मतदान घेण्यात आलं. घटनादुरुस्तीच्या बाजूनं 298 मतदान झालं, तर घटनादुरुस्ती विधेयकाच्या विरोधात 230 मतं नोंदवली गेली.. एकूण 528 खासदारांनी मतदानं केलं.. 528 चं दोन तृतियांश 352 होतं त्यामुळं घटनादुरुस्ती विधेयक मंजुरीसाठी आवश्यक संख्याबळ सरकारकडे नसल्याचं स्पष्ट झालं.. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संविधान 131 वी दुरुस्ती विधेयक, 2026 नामंजूर झाल्याचं जाहीर केलं. यानंतर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी इतर दोन विधेयकं पुढं न नेण्याचा निर्णय घेतला आहे.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदा मोठा झटका

राज्यघटनेच्या कलम ३६८ नुसार, कोणतीही घटनादुरुस्ती मंजूर करण्यासाठी सभागृहात हजर असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी किमान दोन-तृतीयांश (२/३) बहुमत आवश्यक असते… या विधेयकाद्वारे लोकसभेच्या जागा ५४३ वरून ८५० पर्यंत वाढवणे आणि २०११ च्या जनगणनेनुसार मतदारसंघ पुनर्रचना करून महिला आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न होता… मोदी सरकार सत्तेत आल्यापासून पहिल्यांदा एवढा मोठा झटका बसला.. मोदी सरकराने कलम 370 हटवणे, तीन तलाक हटवणे अशी ऐतिहासिक निर्यण घेतली.. मात्र त्यांना या धाडसी निर्णयात देखील अडथळा आला नाही.. पण महिला आरक्षण विधेयकात मोदी सरकारला मोठा धक्का बसला आहे..

आपचे 7 खासदार पकडून भाजपचे संख्याबळ 148 वर

भाजप आपल्या निर्णयावर ठाण असते, असं म्हटलं जातं.. त्यामुळे मोदी सरकार पुन्हा प्रयत्न करुन हे विधेयक लोकसभेतून आणि राज्यसभेत पास करुन घेतील असं म्हटलं जात आहे.. याचं पहिलं पाऊल म्हणून मोदी सरकारने आम आदमी पार्टीचे 7 खासदार फोडल्याची चर्चा आहे.. राज्यसभेत एकूण खासदारांची संख्या 245 आहे.. यातून भाजपचे संख्याबळ आता आपचे 7 खासदार पकडल्यानंतर 148 वर गेले आहे.. जर आता हे विधेयक राज्यसभेत पास करायचे असेल तर भाजपला 164 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे.. त्यामुळे आता भाजपला विशेष बहुमतासाठी 16 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे…

DMK पक्षाकडे लोकसभेत 22 खासदारांची संख्या

स्टॅलिन यांच्या DMK पक्षाकडे लोकसभेत 22 खासदारांची संख्या तर राज्यसभेत 8 खासदारांची संख्या आहे.. जर भाजपने तामिळनाडूत स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसवलं तर त्या बदल्यात भाजप केंद्रात DMKकडून पाठिंबा मागू शकते.. जर DMK ने भाजपला पाठिंबा दिला तर भाजपला हे विधेयक पुन्हा एकदा पारित करुन बहूमत मिळवता येऊ शकते.. त्यामुळे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसने महाविकास आघाडी स्थापन करुन जसे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले होते.. तसंच आता भाजप तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या TVK ला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK आणि AIADMK सह इतर पक्षांना एकत्र आणून स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसवू शकतात, अशी चर्चा आहे..

स्टॅलिन सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार नाहीत

या फक्त चर्चा आहे, अद्याप भाजपकडून किंवा DMK, AIADMK या पक्षांकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाहीये.. स्टॅलिन कधीच सत्तेसाठी भाजपला पाठिंबा देणार नाही, असं म्हटलं जातं.. कारण जर भाजपला एकदा पाठिंबा दिला तर दक्षिण राज्याच्या हातातून लोकसभा जाईल असं म्हटलं जात आहे.. उत्तर भारतातील खासदारांची संख्या वाढल्यानंतर फक्त उत्तर भारतातील खासदारांच्या संख्याबळावरच पंतप्रधान ठरु शकतो.. तसंच भाजपची गोष्ट एकदा ऐकल्यानंतर स्टॅलिन यांना कायम भाजपच्या गोष्टी ऐकाव्या लागतील… स्टॅलिन यांनी आता सत्ता मिळवली तरी त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये आणि भविष्यात याचा मोठा फटका बसू शकतो.. त्यामुळे स्टॅलिन सत्तेपासून दूर राहून पुन्हा पक्ष मजबूत करतील अशी चर्चा आहे..

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts