Vijay Tamil Nadu CM : विजय थलपतींच्या सीएम पदाचा मार्ग आता मोकाळा झाला आहे. थलपतींनी 118 चा मॅजिक फिगर गाठल्याची माहिती समोर आली आहे. तामिळनाडूच्या राजाकारणात मुख्यमंत्री पदावरुन चांगलाच पेच निर्माण झाला होता. तामिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. तामिळनाडूच्या राज्यपालांनी थलपतींना दोनदा परत पाठवत पहिले बहूमताचा आकडा दाखवा आणि गमच मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्या असं म्हटलं होतं. त्यामुळे थलपतींचे चाहते चांगलेच आक्रमक पाहायला मिळत होते. तर देशभरातून विरोधक तामिळनाडूच्या राज्यपालांवर आणि भाजपवर टीका करत होते. मात्र, आता थलपतींच्या TVK पक्षाला काँग्रेसह CPI, CPI-M आणि VCK पक्षांनी पाठिंबा दर्शवल्याची सुत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता थलपती विजय 118 चा मॅजिक आकडा घेऊन तामिळनाडूच्या राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
पण विजय थलपतींसाठी सीएम होणं एवढं सोप आहे का? तामिळनाडूत महाविकास आघाडीच्या पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा होत आहे. थलपतींनी 2 ठिकाणांहून विधानसभा लढवली होती. त्यामुळे एका ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्याने TVK पक्षाकडे फक्त 107 आमदारांचा संख्याबळ असणार आहे. थलपतींनी मोठे प्रयत्न केल्यानंतर आणि काँग्रेसने इतर छोट्या पक्षांची मनधरणी केल्यानंतर या पक्षांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी होकार दिल्याची चर्चा आहे.
एकदा पाहूयात 118 आकड्याचा संख्याबळ कसं जमलंय..
सध्या TVK कडे 107 आमदार आहेत. काँग्रेसच्या 5 आमदारांनी TVK ला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हे संख्याबळ सध्या 112 झालेलं आहे. इतर 3 पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये CPI – 2, CPI-M -2, VCK – 2 या पक्षांचे सर्व आमदार 6 होतात. त्यामुळे आता TVK चं संख्याबळ 112 + 6 = 118 होते. असा गाठलाय विजयने बहुमताचा मॅजिक फिगर.
118 आमदारांच्या पाठिंब्याचं पक्ष घेऊन राज्यपालांची भेट
विजय थलपती आता 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पक्ष घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. मात्र थलपतींनी आकड्याची जूळवाजूळव करत सीएम पदाची शपथ घेतली, तरीही त्यांच्यासमोर सरकार टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान राहाणार आहे. कारण 118 मधून एकही आमदार कमी झाला तरीही थलपतींचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तामिळनाडूत सध्या महाविकास आघाडीच्या पॅटर्नची चर्चा होत आहे. जर थलपतींनी कोणतंही वेगळं पाऊल उचलंल किंवा त्यांनी एखाद्या प्रकरणावरुन DMK आणि AIADMK यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला.. तरीही त्यांचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. TVK ला वगळून DMK आणि AIADMK इतर पक्ष एकत्र आले तरीही तामिळनाडूत नवीन आघाडी सरकार स्थापन होऊ शकतं.
भाजप DMK ला पुन्हा सत्तेत बसवणार
तामिळनाडूच्या राजकारणात आणि देशभरात सध्या भाजप DMK ला पुन्हा सत्तेत बसवणार अशी चर्चा आहे. स्टॅलिन यांच्या DMK पक्षाकडे लोकसभेत 22 खासदारांची संख्या तर राज्यसभेत 8 खासदारांची संख्या. जर भाजपने तामिळनाडूत स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसवलं तर त्या बदल्यात भाजप केंद्रात DMKकडून पाठिंबा मागू शकते. जर DMK ने भाजपला पाठिंबा दिला तर भाजपला हे विधेयक पुन्हा एकदा पारित करुन बहूमत मिळवता येऊ शकते राजकारणात कुणीची कायमचा शत्रू राहत नाही, असं म्हटलं जातं. त्यामुळे DMK आणि AIADMK हे एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असेल तरी सत्तेसाठी आणि भाजपमुळे एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विजय यांनी आपली जादू जरी विधानसभेत दाखवली असली तरी त्यांना आता तामिळनाडूत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दाखवावी लागणार आहे. त्यामुळे आता थलपतींचं सरकार चले तो चाँद तक नाही तर शाम तक, आहे, असं म्हटलं जात आहे.












