Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • बंगालचा सेनापती ठरला! मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री घेणार शपथ 
ताज्या बातम्या

बंगालचा सेनापती ठरला! मुख्यमंत्र्यांसोबत दोन उपमुख्यमंत्री घेणार शपथ 

West Bengal CM Oath Taking Ceremony

West Bengal CM Oath Taking Ceremony: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोठा सत्तासंघर्ष सुरूच असून, ममता बनर्जी राजीनामा न देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. तर राज्यपालांनी ममता सरकार बरखास्त झाल्याचे आदेश जारी केलेत.. आणि आता भाजपा उद्या नवीन सरकार स्थापन करणार आहेत, उद्याच नवीन सरकारचा शपथविधी होणार असल्याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे, यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.. पश्चिम बंगालमध्ये गेल्या अनेक वर्षानंतर एक मोठी ऐतिहासिक घटना घडणार आहे. उद्या भारतीय जनता पक्षाचे सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची बातमी समोर आली आहे.

सुवेंदू अधिकारी हे बांगलाचे नवे मुख्यमंत्री असणार

गेल्या ७६ वर्षात पहिल्यांदाच भाजपाची सत्ता पश्चिम बंगाल मध्ये स्थापन होणार असून सुवेंदू अधिकारी हे बांगलाचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर अनेक राजकीय घडामोडी बंगालच्या राजकरणात घडल्या. यानंतर आता मात्र भाजपचे सरकार स्थापन होत आहे. सुवेंदू अधिकारी उद्या ११ वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याद्वारे असे जाहीर करण्यात आले आहे.

राज्यपाल आर एन रवी यांनी ममता मंत्रिमंडळ बरखास्त

पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांनी ममता मंत्रिमंडळ बरखास्त केलं आहे, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदाच बहुमत मिळालं.., मात्र त्यानंतर मोठा संघर्ष झाल्याच पाहायला मिळालं.. तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला होता. अजूनही ममता दीदी यांनी राजीनामा दिला नाही यामुळे मोठा संघर्ष आणि पेच होता..

मात्र, राज्यपाल आर एन रवी यांनी ममता सरकार बरखास्त केल्याचं जाहीर केलय. राज्यपालांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, “भारतीय राज्यघटनेच्या कलम 174 च्या उप-कलम (2) च्या खंड (b) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, मी 7 मे 2026 पासून पश्चिम बंगाल विधानसभा विसर्जित करत आहे. ” यामुळे कायदेशीररित्या ममता बनर्जी या आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री नाहीत.

 तृणमूल काँग्रेसचा पराभव करून मिळवलं  बहुमत

ममता दिदींनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसला तरी राज्यपालांच्या आदेशानुसार पश्चि बंगाल मध्ये १७ वी विधानसभा बरखास्त झाली आहे. त्यामुळे आता बहुमत असलेल्या भाजपला राज्यपाल नवीन सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. भाजपने २९४ पैकी २०७ जागा जिंकून पश्चिम बंगालमध्ये १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून बहुमत मिळवलं आहे. बंगाल मध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली असून ममता बनर्जी यांची १५ वर्षांची सत्ता उलटली आहे.

उद्या सकाळी ११ वाजता ब्रिगेड परेड मैदानावर शपथविधी सोहळा

आज सर्व आमदारांची बैठक होऊन गटनेता निवडण्यात आला. ९ तारखेला म्हणजेच उद्या ११ वाजता पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन करण्यात येणार आहे. उद्या शुवेंदू अधिकारी हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत दोन उपमुख्यमंत्र्यांचाशपथविधीला पार पडणार असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

पश्चिम बंगालला तब्बल २६ वर्षानंतर उपमुख्यमंत्रीपद मिळणार

सुवेंदू अधिकारी हे पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री असतील. राज्याला दोन उपमुख्यमंत्रीही असतील. रूपा गांगुली यांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती निश्चित झाली आहे. दुसरे उपमुख्यमंत्री दार्जिलिंगचे पुरुष आमदार असतील. सुवेंदू यांच्याकडे गृह मंत्रालयाचा कार्यभार असेल. गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली कोलकाता येथे होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर आज सायंकाळी 5 वाजता या तिघांच्या नावांची घोषणा केली जाईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 9 मे रोजी कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर शपथ घेतील. पंतप्रधान मोदी आणि शाह यांच्यासह एनडीएचे अनेक ज्येष्ठ नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts