Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह कोणकोणते खाते मिळणार; राज्यसभेवर असणार पार्थ पवार यांची वर्णी ?
Top News

सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदासह कोणकोणते खाते मिळणार; राज्यसभेवर असणार पार्थ पवार यांची वर्णी ?

Sunetra Pawar Deputy CM portfolios

Sunetra Pawar Deputy CM portfolios : आज राज्याचे उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पडणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशी चर्चा रंगली होती. आज सुनेत्रा पवार सायंकाळी 5 वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. शपथविधींनंतर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. तसेच शपथविधीपूर्वी राष्ट्रवादीच्या आमदारांची विधानभवनात बैठक पार पडणार आहे. या बैठकीवेळी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड होणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे अर्थ आणि इतर महत्वपूर्ण खाते होते. त्यामुळे आता सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यभारासोबतच कोणते खाते देण्यात येणार याची चर्चा सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे अर्थ खाते वगळून इतर खात्यांची जबाबदारी देण्यातली आहे. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा विभागाची जबाबदारी त्यांच्यावर कायम राहणार आहे. तसेच अर्थसंकल्प अधिवेशनानंतर अर्थ खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून लवकरच याबाबत माहिती मिळेल.

राज्यसभेत पार्थ पवार यांची वर्णी

दुपारी 2 वाजता विधानभवनात राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. यासह उपमुख्यमंत्री पदाची संपूर्ण जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर पडल्यांनंतर त्यांना राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यानंतर राज्यसभेवर रिक्त जागेवर अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत

कुठलाही निर्णय जो काही घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्या पाठीशी आम्ही उभे राहू – सरकार म्हणून आणि भारतीय जनता पार्टी म्हणून. त्यामुळे मी आता आपल्याला एवढंच सांगू शकतो की, अजित दादांचं कुटुंब असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, यांच्या पाठीशी आम्ही पूर्णपणे उभे आहोत. त्यांचे जे काही निर्णय होतील, त्या निर्णयांना योग्य ते समर्थन आमच्याकडून असेल…असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचाजो काही निर्णय घ्यायचा असेल तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घेईल… आम्ही त्यांच्या पाठीशी – मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया

शपथविधी आज आहे याचीही कल्पना नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधत सुनेत्रा पवार यांच्यासोबत माझी कोणतीही चर्चा झाली नसल्याचं सांगितलं. तसेच शपथविधी आज आहे याचीही त्यांना कल्पना नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असल्याचे शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

गोविंद बागेत अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार शरद पवार यांच्या भेटीला

बारामतीच्या गोविंद बागेमध्ये सकाळपासून कार्यकर्त्यांची शरद पवार यांना भेटण्याची लगबग सुरू असून यामध्ये कुठलाही राजकीय नेता पुढारी आमदार हे आले नसून माजी मंत्री संदीप क्षीरसागर हे शरद पवार यांच्या भेटीला दाखल झाले आहेत… आज सकाळपासून पवार कुटुंबाची बैठक सुरू झाली असून यामध्ये खासदार सुप्रिया सुळे कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार तसेच राजेंद्र पवार यांची बैठक सुरू आहे. एकंदरीत पाहता मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या पत्नी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार ह्या अजित पवार यांच्या निधनानंतर चौथ्या दिवशी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून हा शपथविधी सोहळा सायंकाळी पाच वाजता पार पडणार आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts