ABHA Card Download: आजच्या डिजिटल युगात आरोग्यविषयक कागदपत्रांची जाड फाईल सोबत बाळगण्याची गरज उरलेली नाही. आता ABHA कार्ड फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये मोबाईलवर डाउनलोड करून कायमचं सेव्ह करून ठेवता येते.
आजच्या डिजिटल युगात आरोग्यविषयक कागदपत्रे नेहमी सोबत बाळगण्याची गरज कमी होत आहे. आयुष्यमान भारत डिजिटल मिशन (ABDM) अंतर्गत तयार होणारे ABHA (Ayushman Bharat Health Account) कार्ड हे नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त डिजिटल हेल्थ आयडी आहे. या कार्डमध्ये तुमची वैद्यकीय माहिती सुरक्षित स्वरूपात जातं केली जाते. त्यामुळे डॉक्टरांची प्रिस्क्रिप्शन, टेस्ट रिपोर्ट, मेडिसिन हिस्टरी आणि इतर आरोग्यविषयक नोंदी सहज उपलब्ध होतात.
जर तुमच्याकडे ABHA कार्ड असेल, तर ते प्लास्टिक कार्ड स्वरूपात सोबत ठेवण्याचीही गरज नाही. तुम्ही ते काही मिनिटांत मोबाईलवर डाउनलोड करून डिजिटल स्वरूपात वापरू शकता. त्यासाठी तीन सोप्या पद्धती उपलब्ध आहेत.
हेही वाचा: आज अमित शाह आणि धर्मेंद्र प्रधान यांची भेट; दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग
ABHA कार्ड का महत्वाचं आहे?
ABHA कार्ड हे आयुष्मान भारत डिजिटल मिशनअंतर्गत दिले जाणारे एक डिजिटल हेल्थ आयडी आहे. या कार्डमध्ये व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती, जसे की उपचारांचा इतिहास, डॉक्टरांनी दिलेली प्रिस्क्रिप्शन, लॅब चाचण्यांचे अहवाल आणि औषधांची नोंद सुरक्षित स्वरूपात जतन केली जाते. त्यामुळे गरज पडल्यास ही माहिती सहज उपलब्ध होते आणि उपचारादरम्यान वारंवार कागदपत्रे सोबत बाळगण्याची आवश्यकता कमी होते.
1. ABHA पोर्टलवरून डाउनलोड करा
अधिकृत ABHA पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही काही मिनिटांत कार्ड डाउनलोड करू शकता. त्यासाठी पुढील प्रक्रिया करा.
सर्वप्रथम ABHA च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
Login पर्यायावर क्लिक करा.
तुमचा 14 अंकी ABHA क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकून लॉग-इन करा.
OTP टाकून पडताळणी पूर्ण करा.
डॅशबोर्डवर Download ABHA Card या पर्यायावर क्लिक करा.
2. ABHA मोबाईल अॅपद्वारे डाउनलोड करा
ABHA चे अधिकृत मोबाईल अॅप वापरूनही कार्ड सहज डाउनलोड करता येते.
सर्वप्रथम मोबाईलमध्ये ABHA App डाउनलोड करून इन्स्टॉल करा.
नोंदणीकृत मोबाईल क्रमांक किंवा ABHA क्रमांक वापरून लॉग-इन करा.
OTP द्वारे ओळख पडताळणी पूर्ण करा.
प्रोफाइलमध्ये जाऊन View/Download ABHA Card या पर्यायावर क्लिक करा.
काही क्षणांत कार्ड तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.
3. DigiLocker द्वारे डाउनलोड करा
DigiLocker वापरणाऱ्या नागरिकांसाठीही ABHA कार्ड डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
DigiLocker अॅप किंवा वेबसाइटवर लॉग-इन करा.
Health किंवा ABHA विभाग निवडा.
आवश्यक माहिती भरून पडताळणी पूर्ण करा.
त्यानंतर Download पर्यायावर क्लिक करून ABHA कार्ड मोबाईलमध्ये सेव्ह करा.
डिजिटल ABHA कार्ड वापरताना या गोष्टी लक्षात ठेवा
डाउनलोड केलेले PDF सुरक्षित ठिकाणी जतन करा.
मोबाईलला स्क्रीन लॉक किंवा पासवर्ड अवश्य ठेवा.
सार्वजनिक संगणक किंवा इतर उपकरणांवर लॉग-इन केल्यास काम झाल्यानंतर लगेच लॉग-आउट करा.
गरज भासल्यास रुग्णालयात डिजिटल ABHA कार्डची PDF प्रत किंवा मोबाईलवरील कार्ड दाखवू शकता.




