Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देशी Lava चा परदेशात डंका! UK मध्ये उतरला 50MP सेल्फी कॅमेरा असलेला दमदार 5G फोन
विज्ञान- तंत्र

देशी Lava चा परदेशात डंका! UK मध्ये उतरला 50MP सेल्फी कॅमेरा असलेला दमदार 5G फोन

Lava Agni 4N 5G UK Launch
46
Lava Agni 4N 5G UK Launch: भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava ने आता थेट UK मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे. कंपनीने 50MP सेल्फी कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरीसह आपला नवा 5G फोन सादर केला आहे.

भारतीय स्मार्टफोन ब्रँड Lava ने आता आंतरराष्ट्रीय बाजारात (Lava Agni 4N launch) आणखी एक पाऊल पुढे टाकत UK स्मार्टफोन मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने Lava Agni 4N हा नवीन 5G स्मार्टफोन लॉंच केला असून, दमदार हार्डवेअरसोबत क्लीन Android अनुभव आणि AI फीचर्सवर भर देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा, 120Hz AMOLED डिस्प्ले आणि 5000mAh बॅटरी यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

या मोबाईची UK मध्ये किती आहे? (Lava Agni 4N UK price)

Lava Agni 4N UK मार्केटमध्ये 8GB RAM + 256GB स्टोरेज अशा एकाच कॉन्फिगरेशनमध्ये उपलब्ध होणार आहे. या मॉडेलची किंमत £499 म्हणजेच भारतीय चलनात अंदाजे 64 हजार रुपये इतकी आहे. हा फोन Phantom Black आणि Lunar Mist या दोन रंगांमध्ये मिळेल. UK मध्ये या फोनची विक्री ४ सप्टेंबर 2026 पासून Amazon UK च्या माध्यमातून (Lava Agni 4N release date) सुरू होणार आहे. कंपनीने UK ग्राहकांसाठी दोन वर्षांची हँडसेट वॉरंटी देण्याची माहिती दिली आहे. बॅटरीसाठी 12 महिने आणि डेटा केबलसाठी 6 महिन्यांची वॉरंटी असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. (Lava 5G phone, Lava smartphone)

हेही वाचा: ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने ‘ऑपरेशन टायगर पार्ट 2’च्या चर्चांना उधाण

120Hz AMOLED स्क्रीनचा अनुभव

Agni 4N मध्ये 6.67 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्क्रीनला 120Hz रिफ्रेश रेट आणि तब्बल 2,400 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस मिळतो.

डिस्प्ले 10-bit कलर डेप्थ आणि 1.07 अब्ज रंगांना सपोर्ट करतो. त्यामुळे व्हिडीओ, फोटो आणि गेमिंगचा अनुभव अधिक आकर्षक करण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी Corning Gorilla Glass देण्यात आले आहे.

50MP कॅमेरा सेटअप

फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP OIS मुख्य कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी समोर 50MP फ्रंट कॅमेरा मिळतो. विशेष म्हणजे फ्रंट आणि रिअर दोन्ही कॅमेऱ्यांमधून 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट मिळतो.

Vayu AI देणार स्मार्ट फीचर्स

Lava Agni 4N मध्ये कंपनीचे Vayu AI फीचर्सही देण्यात आले आहेत. यामध्ये AI Call Summary, AI Text Assistant, AI Photo Editor, Image Generator आणि डॉक्युमेंट विश्लेषणासारख्या सुविधा समाविष्ट आहेत. याशिवाय Circle to Search आणि व्हॉइस आधारित AI फंक्शन्सचाही वापर करता येतो.

Android 16 आणि अपडेट्सची सुविधा

सॉफ्टवेअरच्या बाबतीत Agni 4N मध्ये Stock Android 16 देण्यात आला आहे. कंपनीने फोनमध्ये अनावश्यक प्री-इन्स्टॉल्ड अॅप्सचा भडिमार न ठेवता क्लीन सॉफ्टवेअर अनुभव देण्यावर भर दिला आहे. Lava कडून दोन Android OS अपग्रेड आणि तीन वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देण्याचे आश्वासन आहे. (best Lava 5G phone)

5000mAh बॅटरी आणि 66W चार्जिंग (ndian smartphone brand Lava)

फोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. ती 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. Lava च्या म्हणण्यानुसार, फोन सुमारे 19 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकतो.

कनेक्टिव्हिटीसाठी 5G, Wi-Fi 6E, Bluetooth 5.4 आणि NFC यांसारखे पर्याय मिळतात. फोनमध्ये USB Type-C पोर्ट, इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि IP64 रेटिंगही आहे. ( LS Marathi News Channel )

फोनमध्ये मिळणार

Agni 4N मधील आणखी एक खास फीचर म्हणजे कस्टमायझेबल वापरकर्त्याला आपल्या गरजेनुसार या बटणावर वेगवेगळ्या शॉर्टकट्स सेट करता येतात. कॅमेरा, टॉर्च किंवा इतर फंक्शन्स पटकन अॅक्सेस करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts