India vs Afghanistan T20: अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामान्यांच्या टी- २० मालिकेसाठी टीप इंडियाची घोषणा झाली आहे. श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असून, जसप्रीत बुमराहसह काही प्रमुख खेळाडूंचं संघात पुनरागमन झालं आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील आगामी टी- २० मालिकेकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून, श्रेयस अय्यरकडे संघांची धुरा सोपवण्यात आली आहे. तिलक वर्माची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
भारत – अफगाणिस्तान ( India vs Afghanistan 2026) टी- २० मालिकेला यंदा १३ सप्टेंबर २०२६ रोजी सुरुवात होणार आहे. मालिकेतील तिन्ही सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. दुसरा सामना १५ सप्टेंबर, तर मालिकेतील अखेरचा सामना 17 सप्टेंबर रोजी होणार आहे.
हेही वाचा: ठाकरे गटाचे 14 आमदार फुटणार? शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याने ‘ऑपरेशन टायगर पार्ट 2’च्या चर्चांना उधाण
संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचं मिश्रण
निवड समितीने या मालिकेसाठी अनुभवी खेळाडूंसोबत युवा चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. जसप्रीत बुमराहचं संघात पुनरागमन झाल्याने भारतीय वेगवान गोलंदाजीला मोठं बळ मिळणार आहे. दुखापतीनंतर नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही पुन्हा संघात स्थान मिळालं आहे. Team India Squad
फलंदाजीमध्ये अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन आणि तिलक वर्मा यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल. अष्टपैलू विभागात शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर हे पर्याय उपलब्ध आहेत.
गोलंदाजीमध्ये बुमराहसोबत अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा हे वेगवान गोलंदाज असतील. फिरकीची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि रवि बिश्नोई यांच्यावर असेल. ( Ls Marathi News Channel )
कोणाला संधी, कोण बाहेर?
या संघात काही प्रमुख खेळाडूंना विश्रांती किंवा संधी न मिळाल्याने चाहत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वैभव सूर्यवंशीसारख्या युवा खेळाडूला स्थान मिळाल्याने नव्या पिढीतील क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये मिळणाऱ्या संधीवरही लक्ष केंद्रित झालं आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा संघ अफगाणिस्तानच्या आक्रमक टी-20 क्रिकेटला कशी टक्कर देतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
India’s squad for Afghanistan T20I series announced. #TeamIndia will play three T20Is against Afghanistan at New Delhi, beginning September 13.#AFGvIND pic.twitter.com/UqTUeZyHz8
— BCCI (@BCCI) September 1, 2026
भारत-अफगाणिस्तान टी-20 मालिकेचं वेळापत्रक BCCI India squad)
पहिला सामना: 13 सप्टेंबर 2026 – नवी दिल्ली
दुसरा सामना: 15 सप्टेंबर 2026 – नवी दिल्ली
तिसरा सामना: 17 सप्टेंबर 2026 – नवी दिल्ली
भारतीय संघ
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा.



