Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • TRAI New Rules: टेलिकॉम ग्राहकांसाठी मोठा बदल; 30 दिवसांच्या प्लॅनपासून Voice-SMS रिचार्जपर्यंत, जाणून घ्या नवे नियम
विज्ञान- तंत्र

TRAI New Rules: टेलिकॉम ग्राहकांसाठी मोठा बदल; 30 दिवसांच्या प्लॅनपासून Voice-SMS रिचार्जपर्यंत, जाणून घ्या नवे नियम

TRAI New Rules
32
TRAI New Rules: मोबाईल रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी दूरसंचार नियामक TRAIने ग्राहकांना अधिक पर्याय मिळावेत यासाठी महत्त्वाचे नियम लागू केले आहेत. विशेषतः ज्यांना मोबाईल डेटाची गरज नाही आणि ज्यांचा वापर मुख्यतः कॉलिंग आणि SMSपुरता मर्यादित आहे, अशा ग्राहकांना या बदलाचा फायदा होऊ शकतो.

अनेक टेलिकॉम कंपन्यांकडून 28 दिवसांची वैधता असलेले रिचार्ज प्लॅन्स दिले जात असल्याने वर्षभरात ग्राहकांना अतिरिक्त रिचार्ज करावा लागतो, अशी चर्चा कायम होती. मात्र, TRAIच्या नियमानुसार प्रत्येक टेलिकॉम सेवा प्रदात्याने किमान एक 30 दिवसांच्या वैधतेचा प्लॅन उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

तसेच महिन्याच्या त्याच तारखेला पुन्हा रिचार्ज करता येईल, असा किमान एक प्लॅन देण्याचीही तरतूद आहे. एखाद्या महिन्यात ती तारीख उपलब्ध नसल्यास त्या महिन्याची शेवटची तारीख नूतनीकरणासाठी लागू होते.

हेही वाचा: ITI पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! DRDOमध्ये अप्रेंटिसशिप, मिळणार 10,560 रुपयांपर्यंत स्टायपेंड

डेटा नको? आता Voice आणि SMS-only पर्याय

TRAIच्या नव्या नियमांचा महत्त्वाचा भाग म्हणजे Voice आणि SMS-only Special Tariff Vouchers. म्हणजेच इंटरनेट डेटा नको असलेल्या ग्राहकांना केवळ कॉलिंग आणि SMSची सुविधा असलेले रिचार्ज पर्याय मिळतील.

नव्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांनी Voice, SMS आणि Data असलेल्या प्रत्येक संबंधित वैधता कालावधीसाठी Voice आणि SMS-only पर्याय उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. या प्लॅन्सच्या किमतीतही डेटा नसल्यामुळे त्यानुसार मोठ्या प्रमाणात प्रमाणबद्ध कपात करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

ग्राहकांना नेमका फायदा काय?

या बदलामुळे प्रत्येक ग्राहकाला एकाच प्रकारचा रिचार्ज करण्याची गरज राहणार नाही. ज्यांना इंटरनेटचा वापर कमी किंवा अजिबात नाही, ते फक्त कॉल आणि SMSसाठी स्वतंत्र प्लॅन निवडू शकतील.

यामुळे अनावश्यक डेटा पॅकसाठी पैसे खर्च करण्याऐवजी ग्राहक आपल्या वापरानुसार प्लॅन निवडू शकतील. विशेषतः साधा फोन वापरणारे, दुय्यम SIM ठेवणारे किंवा मोबाइल डेटाचा कमी वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी हा पर्याय उपयोगी ठरू शकतो.

कंपन्यांना आता काय करावे लागणार?

TRAIच्या नव्या नियमानुसार कंपन्यांना त्यांच्या उपलब्ध Voice, SMS आणि Data प्लॅन्सच्या वैधता कालावधीशी संबंधित Voice-SMS-only पर्याय उपलब्ध करून द्यावे लागतील. हे प्लॅन्स ग्राहकांना सहज दिसतील आणि उपलब्ध होतील, याचीही काळजी सेवा प्रदात्यांना घ्यावी लागणार आहे. TRAIने ग्राहकांना वेबसाइट, अॅप, रिटेल आउटलेट आणि ग्राहक सेवा केंद्रांवर या प्लॅन्सची माहिती स्पष्टपणे उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे.

28 दिवसांचा प्लॅन बंद होणार का?

नाही. 28 दिवसांचे प्लॅन्स पूर्णपणे बंद होतील, असा अर्थ या नियमांचा नाही. कंपन्यांना वेगवेगळ्या वैधतेचे प्लॅन्स देण्याची मुभा कायम आहे. मात्र, ग्राहकांना किमान 30 दिवसांचा पर्याय उपलब्ध असणे आवश्यक आहे आणि Voice-SMS-only श्रेणीमध्येही अधिक पर्याय उपलब्ध करून देण्याची दिशा TRAIने निश्चित केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts