DRDO Apprentice 2026: ITI उत्तीर्ण तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. दिल्लीतील DRDOच्या DIPRमध्ये विविध ट्रेडसाठी उमेदवारांची निवड केली जाणार असून, निवड झालेल्यांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण आणि दरमहा 10,560 रुपयांपर्यंत स्टायपेंड मिळणार आहे.
DRDO Recruitment 2026: ITI पास उमेदवारांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO)मध्ये प्रशिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या तरुणांना अप्रेंटिसशिपची संधी मिळणार आहे. DRDOच्या दिल्लीस्थित डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ सायकॉलॉजिकल रिसर्च (DIPR)ने विविध ट्रेडमधील अप्रेंटिसशिपसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
या भरती प्रक्रियेत विविध ITI ट्रेडमधील उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
१२ महिन्यांची अप्रेंटिसशिप
निवड झालेल्या उमेदवारांना DRDOच्या DIPRमध्ये एक वर्ष म्हणजेच १२ महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही अप्रेंटिसशिप पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला DRDO मध्ये कायमस्वरूपी नोकरीचा हक्क मिळणार नाही.
अप्रेंटिसशिपचा कालावधी निश्चित असून तो वाढवला जणार नसल्याचे भरतीच्या नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या ट्रेडसाठी जागा?
या अप्रेंटिसशिपमध्ये विविध ITI ट्रेडचा समावेश करण्यात आला आहे. पात्र उमेदवारांना पुढील ट्रेडसाठी अर्ज करता येईल:
फोटोग्राफर
स्टुअर्ड
डेस्कटॉप पब्लिशिंग ऑपरेटर
सेक्रेटेरियल असिस्टंट
COPA
IT/IT ESM
मल्टीमीडिया आणि वेब पेज डिझायनर
उमेदवारांनी आपल्या ITI ट्रेडनुसार संबंधित पदासाठी पात्रता तपासूनच अर्ज करणे आवश्यक आहे.
निवड कशी होईल?
DRDOच्या या अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड मुख्यतः मेरीटच्या आधारे केली जाणार आहे. उपलब्ध माहितीनुसार, निवडीसाठी स्वतंत्र लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही.
ITI अभ्यासक्रमात मिळवलेल्या गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार केली जाऊ शकते. अर्जांची संख्या अधिक असल्यास उमेदवारांची मुलाखत घेण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. अंतिम निवड यादी प्रवर्गनिहाय जाहीर करण्यात येईल.
दरमहा स्टायपेंड किती मिळणार?
जर अप्रेंटिस म्हणून निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान स्टायपेंड मिळणार आहे. IT /IT ESM आणि फोटोग्राफर ट्रेंडसाठी १०,५६० रुपये प्रतिमहिना, तर इतर ट्रेडमधील उमेदवारांना ९,६०० रुपये प्रतिमहिना स्टायपेंड देण्यात येणार आहे.
१२ महिन्यांची कालावधी लक्षात घेतल्यास संबंधित ट्रेडनुसार एकूण स्टायपेंड सुमारे १.१५ लाख ते १.२७ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
अर्ज कोण करू शकतो?
संबंधित ट्रेडमध्ये ITI चे प्रमाणपत्र असलेले उमेदवार या संधीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी Apprenticeship India पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया Apprenticeship Indiaच्या अधिकृत पोर्टलवर पूर्ण करावी लागेल. अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ ऑक्टोबर २०२६ आहे.
उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता, ट्रेड, आवश्यक कागदपत्रे आणि इतर अटी काळजीपूर्वक तपासाव्यात. भरतीशी संबंधित कोणतीही माहिती बदलू शकते, त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन पाहणे महत्त्वाचे आहे.



