Breaking News :
  • Home
  • क्रीडा
  • Live सामन्यात प्रेयसीला मेसेज करणं पडलं महागात; क्रिकेटपटूवर बोर्डाची मोठी कारवाई
क्रीडा

Live सामन्यात प्रेयसीला मेसेज करणं पडलं महागात; क्रिकेटपटूवर बोर्डाची मोठी कारवाई

Cricketer Messages Girlfriend
5
Cricketer Messages Girlfriend: क्रिकेटमध्ये मैदानावरील कामगिरीइतकंच खेळाडूंचं शिस्तबद्ध वर्तनही महत्त्वाचं मानलं जातं. मात्र एका क्रिकेटपटूने आपल्या प्रियसीला मेसेज करणं पडलं चांगलंच महागात पडलं. बोर्डाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई केली.

क्रिकेटमध्ये मैदानावरील कामगिरीइतकंच खेळाडूंचं शिस्तबद्ध वर्तनही महत्वाचं मानलं जातं. विशेषतः सामान्यदरम्यान मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करण्याबाबत क्रिकेट नियामक संस्थांचे नियम अंत्यत कडक आहेत. यामागे केवळ शिस्तीचा मुद्दा नसून सामन्याची गोपनीयता आणि खेळाची विश्वासार्हता जपण्याचा उद्देश आहे.

सामान्याशी संबंधित संवेशनशील माहिती बाहेर जाण्याची शक्यता असल्याने खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या संवादावर निर्बंध ठेवले जातात. BCCIच्या भ्रष्ट्राचारविरोधी व्यवस्थेनुसार सामान्याशी संबंधित संशयास्पद कृती किंवा नियमभंगाची माहिती तपास यंत्रणेकडे पाठवली जाऊ शकते. चौकशीनंतर दोष सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर नियमांनुसार कारवाई होऊ शकते. Cricketer Mobile Use During Match

हेही वाचा: लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा; विकसित भारताच्या संकल्पाचा पंतप्रधान मोदींचा निर्धार

मोबाईल वापरावर एवढी कडक नजर का?

सामान्याच्या काळात संघाच्या डगआउट, ड्रेसिंग रूम किंवा इतर प्रतिबंधित भागांमध्ये मोबाईलचा वापर केल्यास गोपनीय माहिती बाहेर जाण्याचा धोका निर्माण होतो. खेळाडूंकडे सामन्याची परिस्थिती, संघाची रणनीती किंवा इतर संवेदनशील माहिती असू शकते. त्यामुळे अशा उपकरणांच्या वापरावर नियंत्रण ठेवले जाते.

BCCIच्या अधिकृत नियमांमध्ये भ्रष्टाचार, बेटिंग आणि सामान्याशी संबंधित माहितीचा गैरवापर यांसारख्या बाबींना गंभीरपणे घेतले जाते. दोषाच्या स्वरूपानुसार निलंबन, दंड किंवा इतर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते.

नियम मोडल्यास थेट कारवाई होते का?

प्रत्येक प्रकरणाची परिस्थितीनुसार चौकशी केली जाते. आरोप किंवा संशय निर्माण झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडून तपास केला जाऊ शकतो. त्यानंतर उपलब्ध पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुढील कारवाई ठरवली जाते.

अलीकडे IPLमध्येही डगआउटमध्ये मोबाईल वापरल्याप्रकरणी राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरवर ₹१ लाखांचा दंड करण्यात आला होता. अधिकृत IPL निवेदनानुसार ही PMOA प्रोटोकॉलची पहिली उल्लंघनाची घटना होती.

त्यामुळे क्रिकेटमध्ये मैदानाबाहेरील वर्तनालाही तितकेच महत्त्व आहे. मोबाईलचा साधा वापर वाटत असला तरी सामन्याच्या वातावरणात तो नियमभंग ठरू शकतो आणि संबंधित व्यक्तीला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts