Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र

मोठी बातमी! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Manoj Jarange Patil Health Update
3
Manoj Jarange Patil Health Update: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय झालं आहे. चला तर जाणून घेउयात.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबत (Manoj Jarange Patil Health Update) महत्वाची माहिती समोर येत आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने वैद्यकीय उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर वैद्यकीय माहिती किंवा रुग्णालयाकडून अधिकृत हेल्थ अपडेट अद्याप स्पष्ट (Manoj Jarange Patil Hospital News) झालेला नाही.

हेही वाचा: लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्यदिनाचा सोहळा; विकसित भारताच्या संकल्पाचा पंतप्रधान मोदींचा निर्धार

गेल्या काही दिवसांपासुन जरांगे पाटील (Jarange Patil) पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर बैठका घेतल्या आणि समाजबांधवांशी संवाद साधला. सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव परिसरात त्यांच्या दौऱ्यादरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दौऱ्यादरम्यान सततचा प्रवास, सभा आणि कार्यकर्त्यांशी भेटीगाठी यामुळे त्यांच्या प्रकृतीवर ताण पडण्याची चर्चा आहे. यापूर्वीही आंदोलन आणि उपोषणाच्या काळात त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज भासली होती. मे २०२६ मध्येही प्रकृती खालावल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार करण्यात आले होते.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान त्यांच्या ताफ्यातील वाहनांना अपघात झाल्याची घटनाही घडली होती. सांगली जिल्ह्यातील विटा परिसरात झालेल्या या घटनेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली होती. जखमी कार्यकर्त्याला जरांगे पाटील यांनी स्वतः रुग्णालयात दाखल केले होते.

मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation News) मुद्द्यावर जरांगे पाटील यांची भूमिका सातत्याने आक्रमक राहिली आहे. पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यातही त्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारवर टीका करत समाजबांधवांशी संवाद साधला.

आता त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय माहिती समोर आल्यानंतरच त्यांच्या तब्येतीची नेमकी स्थिती स्पष्ट होणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts