Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
Top News

भरलेल्या मैदानावर अनुष्काला DKने मारली मिठी, विराट झाला लाल भडक…

DK hugs Anushka Sharma

DK hugs Anushka Sharma : आयपीएलची अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात विराट कोहलीच्या ७५ धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर आरसीबीने गुजरातला ५ विकेट्सने गुजरातला पराभवाची धूळ चारली. सलग दुसऱ्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मात्र, या दणदणीत विजयापेक्षा सामन्यानंतर मैदानावर घडलेल्या एका वेगळ्याच घटनेची सोशल मिडियावर तुफान चर्चा रंगली आहे.

विजयानंतर आरसीबीचा संपूर्ण संघ मैदानावर जल्लोष करत होता. यावेळी अनुष्का शर्मानेही मैदानावर पळत येऊन पती विराटला मिठी मारत विजयाच्या शुभेच्छा दिल्या. दोघेही चषकासोबत फोटो काढण्यात मग्न होते. त्याचवेळी तिथे भारतीय क्रिकेटर दिनेश कार्तिक पोहोचला. विजयाच्या अत्यानंदात त्यानेही अनुष्काला घट्ट मिठी मारून तिचे अभिनंदन केले. मात्र, डीकेने अनुष्काचे अभिनंदन का केलं? हे सर्वांनाच न उलगडणारे कोडे आहे. मात्र, यापेक्षाही वेगळी चर्चा रंगली ते म्हणजे मागे उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या चेहऱ्यावरील जे भाव उमटले त्याची.

“आता पुरे झाले, बाजूला हो”

दिनेश कार्तिक अनुष्काला मिठी मारत असताना विराटने मागून येत हळूच अनुष्काच्या पाठीवर थाप मारली. जणू काही “आता पुरे झाले, बाजूला हो” असा इशाराच तो देत होता. यानंतरही अनुष्का आणि कार्तिक बराच वेळ गप्पा मारत उभे होते आणि विराट त्यांच्या शेजारीच राहून दोघांकडे एकटक पाहत होता.

विराटने अत्यंत लाडात तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढल्याचे

विराटचा हा हक्क गाजवणारा अंदाज कॅमेऱ्यात अचूक कैद झाला आणि सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अर्थात, विराटचा हा क्युट आणि पजेसिव्ह स्वभाव चाहत्यांसाठी नवीन नाही. याआधीही आरसीबीच्या विजयानंतर अनुष्का इतर खेळाडूंना शुभेच्छा देत असताना विराटने अत्यंत लाडात तिचा हात धरून तिला स्वतःकडे ओढल्याचे पाहायला मिळाले होते.

चाहत्यांनी अनुष्काला संघाची ‘लकी चार्म’ घोषित केले

या सगळ्यात मैदानावर विराट आणि अनुष्काचा रोमँटिक अंदाजही चाहत्यांना पाहायला मिळाला. सामना जिंकल्या-जिंकल्या विराटने अनुष्काला फ्लाइंग किस दिला. आरसीबीच्या या सलग दुसऱ्या विजयानंतर चाहत्यांनी अनुष्काला संघाची ‘लकी चार्म’ घोषित केले आहे. तसेच, पतीच्या आणि संघाच्या या ऐतिहासिक यशाचा अभिमान अनुष्काच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts