IND vs NZ 1st T20I : भारत आणि न्यूझीलंड क्रिकेट संघातील वनडे मालिका संपली आहे. आज 21 जानेवारीपासून दोन्ही संघांमध्ये टी-20 सामने खेळवले जातील. यातील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांसाठी ही शेवटची मालिका आहे. त्यामुळं, भारत आणि न्यूझीलंड दोन्ही संघ त्यांच्या तयारीला अंतिम रुप देण्याचा प्रयत्न करतील.
हेड-टू-हेडमध्ये भारत पुढं :
न्यूझीलंडनं नेहमीच भारतीय संघाला आव्हान दिला आहे. मात्र, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघ न्यूझीलंडवर थोडासा आघाडीवर आहे. दोघांमध्ये आतापर्यंत 25 सामने झाले आहेत. त्यापैकी 14 सामने भारतानं जिंकले आहेत, तर 10 सामने न्यूझीलंडनं जिंकले आहेत. भारताच्या 14 विजयांपैकी दोन सुपर ओव्हर विजय होते. 2020 च्या न्यूझीलंड दौऱ्यादरम्यान, भारतानं सुपर ओव्हरमध्ये सलग दोन सामने जिंकले, तर दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला.
न्यूझीलंडनं भारतात जिंकला टी-20 मालिका :
न्यूझीलंडनं भारतात पहिली टी-20 मालिका जिंकली आहे. 2012 मध्ये, कीवी संघानं भारताचा दौरा केला. न्यूझीलंडनं दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. पहिला सामना पावसामुळं रद्द झाला. दुसरा सामना न्यूझीलंडनं शेवटच्या चेंडूवर एका धावेनं जिंकला. तर, भारतीय संघानं त्यानंतरच्या तिन्ही मालिका जिंकल्या.
सामन्यासाठी दोन्ही संघ :
- भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सैमसन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (पहिले तीन टी-20), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंह, जसप्रित बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, ईशान किशन (विकेटकीपर), रवि बिश्नोई.
- न्यूजीलंड : मिशेल सेंटनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, जैकब डफी, जैक फाउल्क्स, मैट हेनरी, काइल जैमीसन, बेवन जैकब्स, डेरिल मिशेल, जेम्स नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, टिम रॉबिन्सन, ईश सोढी.








