Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • नागपूरच्या प्रफुलची IPL च्या पहिल्याच सामन्यात कमाल; पहिल्याच षटकात 3 विकेट घेत रचला इतिहास
क्रीडा

नागपूरच्या प्रफुलची IPL च्या पहिल्याच सामन्यात कमाल; पहिल्याच षटकात 3 विकेट घेत रचला इतिहास

नागपूरच्या प्रफुलची IPL च्या पहिल्याच सामन्यात कमाल; पहिल्याच षटकात 3 विकेट घेत रचला इतिहास

हैदराबाद Praful Hinge : आयपीएल 2026 च्या सलामीच्या सामन्यांमध्ये राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या हंगामातील पाचव्या सामन्यातही अशाच अपेक्षा होत्या. मात्र, आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या प्रफुल्ल हिंगेनं हैदराबादसाठी डावाच्या पहिल्याच षटकात तीन बळी घेतले. त्यानं षटकाच्या दुसऱ्या, चौथ्या आणि सहाव्या चेंडूवर बळी मिळवले. यासह त्यानं नवा इतिहास लिहिला आहे (first player in ipl history).

हेही वाचा : फलंदाजांच्या वादळी खेळीच्या बळावर RCB चा विजय; मुंबईचा सलग तिसरा पराभव

वैभव सूर्यवंशी गोल्डन डकवर बाद :

जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूडसारख्या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर षटकार मारणारा वैभव सूर्यवंशी (Vaibhav Sooryavanshi) या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला आहे. यशस्वीनं प्रफुल्ल हिंगेच्या षटकातील पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. वैभवनं दुसरा चेंडू हवेत उंच मारला, जो यष्टीरक्षक सलील अरोरानं सहज झेलला. त्यानंतर त्यानं चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलला त्रिफळाचीत केलं. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेचा लुआन-ड्रे प्रिटोरियस सीमारेषेवर झेलबाद झाला (3 wickets in first over).

आयपीएलच्या पहिल्याच षटकात तीन बळी घेणारा पहिला खेळाडू :

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली. डावाच्या पहिल्याच षटकात तीन बळी पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत गोलंदाजांनी 32 वेळा डावाच्या पहिल्याच षटकात दोन बळी घेतले आहेत. यापूर्वी भुवनेश्वर कुमारनं हा पराक्रम केला होता. 2024 मध्ये याच मैदानावर भुवीनं हैदराबादकडून खेळताना जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांना बाद केलं होतं.

कोण आहे प्रफुल हिंगे :

हे लक्षात घेण्यासारखं आहे की प्रफुल्ल हिंगेचा जन्म नागपूरमध्ये झाला असून तो विदर्भकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. हिंगेनं 10 प्रथम-श्रेणी सामने आणि सहा लिस्ट ए सामने खेळले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, त्यानं सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये आंध्रविरुद्ध टी-20 पदार्पण केलं. गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल लिलावात, सनरायझर्स हैदराबादनं हिंगेला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत आपल्या संघात घेतलं होतं आणि आता आयपीएल 2026 मधील आपला पहिला सामना खेळताना, त्यानं आपल्या पहिल्याच षटकात 3 बलाढ्य फलंदाजांना शून्यावर बाद करुन आयपीएलमध्ये एक नवीन विक्रम रचला आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts