Breaking News :
  • Home
  • Top News
  • हा फक्त मार्केटिंग स्टंट…’ प्रसिद्ध डेव्हलपरचा दावा; Anthropic च्या ‘Mythos’ मुळे मोठा बदल होणार नाही
Top News

हा फक्त मार्केटिंग स्टंट…’ प्रसिद्ध डेव्हलपरचा दावा; Anthropic च्या ‘Mythos’ मुळे मोठा बदल होणार नाही

Anthrop

Anthropic Mythos AI: AI क्षेत्रात सध्या Anthropic च्या ‘Mythos’ मॉडेलची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. कंपनीने हे मॉडेल अत्यंत प्रगत असून कोडमधील सुरक्षा त्रुटी शोधण्यात इतर AI पेक्षा अधिक प्रभावी असल्याचा दावा केला होता. मात्र आता या दाव्यांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

प्रसिद्ध सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि cURL चे निर्माते Daniel Stenberg यांनी ‘Mythos’ मॉडेलच्या क्षमतेबाबत संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, या AI मॉडेलभोवती निर्माण करण्यात आलेली भीती आणि चर्चा ही वास्तवापेक्षा अधिक मार्केटिंगसारखी वाटते.

हेही वाचा: शुक्र आणि बुध करणार राशी परिवर्तन! १४ मेपासून ‘या’ राशींच्या आयुष्यात होणार सकारात्मक बदल; वाचा तुमचे राशीभविष्य

AI मॉडेलची चाचणी करताना काय समोर आले?

स्टेनबर्ग यांनी सांगितले की त्यांच्या ओपन- सोर्स प्रोजेक्टचा AI द्वारे सिक्युरिटी स्कॅन कारण्यात आला. या स्कॅनमध्ये सुरुवातीला अनेक सुरक्षा त्रुटी असल्याचा दावा करण्यात आला होता.

मात्र प्रत्यक्ष तपासणी केल्यानंतर बहुतेक त्रुटी चुकीच्या असल्याचे समोर आले. केवळ एकच त्रुटी वास्तविक होती आणि तीही कमी गंभीर स्वरूपाची असल्याचे त्यांनी नमूद केले.

त्यांच्या मते, अशा प्रकारच्या चुका इतर AI मॉडेल्समध्येही आढळतात आणि त्यामुळे Mythos ला अत्यंत वेगळे किंवा धोकादायक म्हणणे योग्य ठरणार नाही.

cURL म्हणजे काय?

cURL हे इंटरनेटद्वारे डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरले जाणारे अत्यंत लोकप्रिय टूल आहे. वेबसाइट्स, APIs, सर्व्हर टेस्टिंग आणि विविध नेटवर्क प्रोटोकॉल्ससाठी जगभरातील डेव्हलपर्स त्याचा वापर करतात.
हे टूल Windows, Linux आणि macOS सारख्या अनेक ऑपरेटिंग सिस्टिममध्ये वापरले जाते आणि अनेक डिजिटल सेवांच्या मागे त्याचा अप्रत्यक्ष वापर असतो.

‘Project Glasswing’ कार्यक्रमातून मिळाला अनुभव

स्टेनबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की त्यांना Anthropic च्या ‘Project Glasswing’ उपक्रमाद्वारे Mythos मॉडेलबाबत माहिती मिळाली होती.
या प्रक्रियेत AI मॉडेलने cURL च्या कोडचे विश्लेषण केले आणि संभाव्य सिक्युरिटी त्रुटींचा अहवाल तयार केला. मात्र सखोल तपासणीनंतर बहुतेक त्रुटी ‘फॉल्स पॉझिटिव्ह’ असल्याचे स्पष्ट झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts