Bank Holidays May 2026: यंदा मे २०२६ मध्ये बँक ग्राहकांनासाठी सुट्ट्यांचा मोठा फटका बसणार आहे. RBI च्या अधिकृत कॅलेंडरनुसार या महिन्यात देशभरात सुमारे १२ दिवस बँक शाखा बंद राहणार आहे.
आज पासून मे महिना सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बुद्ध पौर्णिमेनिमित्तामुळे बँकांना सुट्टी असल्याने या महिन्यात आता एकूण किती दिवस सुट्या असणार असा प्रश्न बरेचं ग्राहकांना पडला आहे. मे २०२६ मध्ये देशभरातील बँका एकूण सुमारे १२ दिवस बंद राहणार आहेत.
हेही वाचा: प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल उद्या जाहीर; दुपारी १ वाजता या वेबसाईटवर पाहता येणार
यंदाचा उन्हाळा पाहता जर तुम्ही सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात, तर अनावश्यक त्रास होऊ शकतो. त्यामुळे बँकेशी संबंधित कामे करण्यापूर्वी सुट्ट्यांची यादी तपासूनच नियोजन करणे अधिक सोयीचे ठरू शकेल.
मे 2026 मधील प्रमुख बँक सुट्ट्या
१६ मे २०२६: सिक्कीम राज्य दिनानिमित्त सिक्कीममधील सर्व बँका बंद राहतील.
२६ मे २०२६: काजी नजरुल इस्लाम जयंतीमुळे त्रिपुरामध्ये बँका बंद राहतील.
२७ मे 2026: बकरी ईद (Eid-ul-Adha) निमित्त देशातील अनेक राज्यांमध्ये बँक सुट्टी असेल.
२८ मे 2026: काही राज्यांमध्ये बकरी ईदनंतर अतिरिक्त सुट्टी लागू राहील.
साप्ताहिक सुट्ट्या
मे महिन्यातील सर्व रविवार आणि दुसरा व चौथा शनिवार या नियमानुसार बँका बंद राहतील. यामुळे महिन्यात एकूण 7 साप्ताहिक सुट्ट्या येतात.
महाराष्ट्रातील बँक सुट्ट्या
1 मे – महाराष्ट्र दिन
3 मे – रविवार
9 मे – दुसरा शनिवार
10 मे – रविवार
17 मे – रविवार
23 मे – शनिवार
24 मे – रविवार
28 मे – बकरी ईद
31 मे – रविवार
कोणत्या सेवा सुरू राहतील?
बँक शाखा बंद असल्या तरी UPI पेमेंट, नेट बँकिंग, IMPS / NEFT / RTGS, आणि ATM सेवा या डिजिटल सेवा सुरू राहतील.






