Prateek Yadav’s Post-Mortem Report | दिवंगत सपा नेते मुलायम सिंह यादव (Mulayam Singh Yadav) यांचे पुत्र आणि अखिलेश यादव यांचे धाकटे बंधू प्रतीक यादव (Prateek Yadav) यांचं निधन झालं आहे. प्रतीक यादव यांनी वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. प्रतीक यादव यांना लखनौच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत अवस्थेत आणण्यात आले होते. प्रतीक यादव हे आपल्या फिटनेसबाबत खूप गंभीर होते. पण अचानक झालेल्या त्यांच्या निधनाने समाजवादी पक्ष परिवारात मोठी खळबळ उडाली असून त्यांच्या मृत्यूबाबात संशय व्यक्त केला जात होता. अशातच आता त्यांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे.
हेही वाचा – PM मोदींची जगभर चर्चा; परदेशी नेत्याने केलं खास कौतुक, म्हणाले, “मोदींसारखा नेता…”
प्रतीक यादव यांच्या शवविच्छेदन अहवालात नेमका काय झाला खुलासा?
प्रतीक यादव यांच्या मृत्यूचा शवविच्छेदन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले आहे. अहवालानुसार, त्यांच्या शरीरात रक्ताची गुठळी तयार झाली होती. ही रक्ताची गुठळी शरीराच्या खालच्या भागातून वरच्या भागात पसरली होती. त्यानंतर धमन्या आणि फुफ्फुसांमध्ये याचा संसर्ग झाला ज्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
प्रतीक यादव यांच्या शवविच्छेदन अहवालात सविस्तरपणे नमूद केले आहे की, हृदय आणि श्वसन प्रक्रिया अचानक थांबल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेत अहवालात त्यांच्या फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची मोठी गुठळी असल्याचे आढळले आहे.
अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, हृदय आणि फुफ्फुसांमधील संपूर्ण थ्रोम्बोएम्बोलिक सामग्री पुढील हिस्टोपॅथॉलॉजिकल तपासणीसाठी फॉर्मेलिनमध्ये जतन करण्यात आली आहे. अंतर्गत अवयवांचे नमुने रासायनिक विश्लेषणासाठी जतन करून संबंधित प्राधिकरणाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. तसेच प्रतीक यादव यांच्या शवविच्छेदन अहवालात स्पष्टपणे लिहिले आहे की, त्यांच्या शरीरावर आढळलेल्या सर्व जखमांच्या खुणा मृत्यूपूर्वीच्या आहेत, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.









