• Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदेंची जिभ घसरली! सभागृहात बोलताना म्हणाले, आमदार सचिन…
Top News

एकनाथ शिंदेंची जिभ घसरली! सभागृहात बोलताना म्हणाले, आमदार सचिन…

Eknath Shinde

Eknath Shinde: आज सचिन आहिर यांनी ठाकरे गटाची साथ सोडत अचानक शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सचिन आहिर यांच्याबाबत एक गंमतीशीर शब्दचूक केली. नेमकं काय घडलं, जाणून घ्या

विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. शिवसेना (शिंदे गट) कडून सचिन आहिर यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा: मोठी बातमी! सचिन अहिर शिंदे गटात; उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे गटाला पुन्हा धक्का

शिंदेकडून चूक

यावेळी बोलताना शिंदे यांच्या तोंडून एक गंमतीशीर चूक झाली. सचिन आहिर यांचा उल्लेख करताना त्यांनी चुकून ” आमदार सचिन तेंडुलकर..” असे म्हटले. ही चूक लक्षात येताच संभागृहात उपस्थित नेते आणि पत्रकार हसले. काही क्षणांनी शिंदे यांनी स्वतः चूक दुरुस्त करत सचिन आहिर यांचा उल्लेख केला.

क्रिकेटची उपमा देत राजकीय भाष्य

यानंतर शिंदे यांनी क्रिकेटची उपमा देत राजकीय भाष्य केले. “सचिन आहिर यांनी आज षटकार मारला आहे. गेल्या काही दिवसांत सहा खासदार आमच्यासोबत आले आणि आता आणखी एक मोठी राजकीय खेळी झाली आहे,” असे ते म्हणाले.

राजकीय कारकिर्दीचाही शिंदे यांनी गौरव

सचिन आहिर यांच्या राजकीय कारकिर्दीचाही शिंदे यांनी गौरव केला. ते तीन वेळा आमदार राहिले असून राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. तसेच मुंबईतील गिरणी कामगार, कोळीवाडे आणि स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दरम्यान, सचिन आहिर यांच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे ठाकरे गटाला आणखी एक मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. उपसभापतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घडामोड महत्त्वाची मानली जात असून, राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts