• Home
  • ताज्या बातम्या
  • जो रूट याच ऐतिहासिक शतक, ऑस्ट्रेलियाला एकटा फिडला, पहिल्या दिवसात 325 धावा
Top News

जो रूट याच ऐतिहासिक शतक, ऑस्ट्रेलियाला एकटा फिडला, पहिल्या दिवसात 325 धावा

Joe Root Century

 Joe Root Century : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एशेज कसोटी मालिका सुरू आहे. पिंक बॉल सामन्यातील आज पहिला दिवस होता. पहिल्या दिवशी पहिल्या काही सत्रात ऑस्ट्रेलियाची स्थिती अतिशय खराब पाहायला मिळाला. पहिल्या फळीतील फलंदाजांच्या पटापट विकेट पडल्यानंतर संघाचा सर्व भार जो रूट वर आला पण तो ऑस्ट्रेलियाचा गोलंदाजांना एकटा नडला आणि आपलं ऐतिहासिक शकत केलं. तसचं पहिल्या दिवसात 325 धावा उभ्या करत संघाला सावरण्याच्या प्रयत्न केला.

पहिल्या दिवसात 74 षटकांचा खेळ झाला आणि इंग्लंडने 9 गडी गमावून इंग्लंडने 325 धावा केल्या आहेत. त्यामुळे इंग्लंड पहिल्या दिवशी तरी मजबूत स्थितीत दिसत आहे. इंग्लंडकडून सॅक क्राउली आणि जो रूट यांनी सावध आणि महत्त्वपूर्ण खेळी केली. झंक क्राउलीच्या 76 धावा आणि पहिल्या दिवशी जो रूटच्या नाबाद 135 धावांच्या जोरावर 325 धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध च्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा; पंड्या, गिल कमबॅक

जो रूट आणि जोफ्रा आर्चरने शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाला रडवलं

मधल्या फळीत धडाधड विकेट पडल्यानंतर जो रूट आणि जोफ्रा आर्चरने शेवटच्या विकेटसाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना रडवलं. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी नाबाद 61 धावांची भागीदारी केली आहे. दुसऱ्या दिवशी या जोडीने आणखी काळ तग धरला तर आरामात 100ची भागीदारी होऊ शकते. खरं तर शेवटची विकेट घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना चांगलाच घाम गाळावा लागला. पण विकेट काय हाती लागली नाही.

झंक क्राउली आणि जो रूट यांच्यात 117 धावांची भागीदारी

नाणेफेकीचा कौल इंग्लंडने जिंकला आणि प्रथम फलंदाजी घेतली. खरं तर इंग्लंडची सुरुवात काही चांगली झाली नाही. बेन डकेट आणि ओली पोप हे दोघेही स्वस्तात बाद झाले. या दोघाना खातं खोलता आलं नाही. त्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत आला होता. झंक क्राउली आणि जो रूट यांनी तिसऱ्या विकेटसाठी मैदानात जम बसवला. दोघांनी 152 चेंडूत 117 धावांची भागीदारी केली. झंक क्राउली 76 धावा करून बाद झाला. त्यानंतरही एका बाजून जो रूट खिंड लढवत राहिला. हॅरी ब्रूक 31, बेन स्टोक्स 19, जेमी स्मिथ 0, विल जॅक्स 19, गस एटकिनसन 4, ब्रायडन कार्स 0 असे झटपट गडी बाद झाले.

मिचेल स्टार्ककडून  19 षटकात 71 धावा देत 6 गडी बाद

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली. त्याने 19 षटकात 71 धावा देत 6 गडी बाद केले. तर मायकल नेसेर आणि स्कॉट बोलँड यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तर ब्रेंडन डॉगेट आणि कमरून ग्रीन यांना काही विकेट मिळाली नाही. इंग्लंडसाठी दुसरा कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाला तर मालिकेवरील पकड सैल होईल याची जाणीव आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून 1-1 अशी बरोबरी साधण्याचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts