Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • नाशकात सापडला एपिस्टीन, नामांकित महिला अन् सिलेब्रिटींचे ५८ अश्लील व्हिडीओ समोर…
Top News

नाशकात सापडला एपिस्टीन, नामांकित महिला अन् सिलेब्रिटींचे ५८ अश्लील व्हिडीओ समोर…

Obscene Videos of Celebrities

Obscene Videos of Celebrities : अमेरिकेतला गुन्हेगार एपिस्टीनच्या फाईल्स गाजल्या आणि आता आपल्या राज्यातून समोर आलाय नाशिकचा एपिस्टीन. एकून नवल वाटेल पण नाशिकमध्ये पोलीसांनी एका अशा ज्योतिष बाबाच्या मुसक्या आवळल्यात ज्याच्याकडे नामांकित महिला आणि सेलिब्रीटींचे तब्बल 58 अश्लील व्हिडीओ सापडलेत. त्याच्यावर अनेक महिलांच्या शारीरिक शोषणाचे आरोप आणि बलात्काराचे गुन्हेही दाखल आहे. पण याहून धक्कादायक बातमी पुढे आहे. की या बलात्कारी बाबाला खतपाणी घालणारे आपल्याच राज्यातले अनेक सो-कॉल्ड मान्यवर नेतेमंडळी आहेत.

महिलांवरचे अत्याचार रोखण्यासाठी महिला आयोग बनवलंय. पण त्याच आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर या बाबाचे पाय धुतायत. तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना या बाबाच्या मंदिरात जाऊन आलेले. काय आहे हा सगळा प्रकार. या अश्लील बाबाचं काय असं गौडबंगाल आहे की मोठी-मोठी लोकं त्याच्या आहारी गेलेत सविस्तर माहिती घेऊ या लेखातून…

नाशिकचा एपिस्टीन स्वघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात

हा सगळा प्रकार जाणून घेण्याआधी पाहुयात कोण आहे हा नाशिकचा एपिस्टीन स्वघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरात. अंधश्रद्धेच्या आड काळं कारस्थान करणाऱ्या अशोक खरात प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे बाहेर येऊ लागलेत. दैवशक्तीचा बनाव करून ‘कॅप्टन’च्या नावाखाली विकृत कृत्य करणारा हा खरात स्वतःला कॉस्मोलॉजी तज्ज्ञ आणि भविष्यवक्ता म्हणवणारा नाशिकचा ज्योतिषी अशोक खरात हा एक चुटकीत भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध आहे. राज्यातल्या अनेक प्रभावशाली चेहऱ्यांमध्ये त्याची दहशत असल्याचं समजतं.

ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा दावा

कॅप्टन खरातचे मोठमोठ्या राजकारण्यांशी संबंध आहेत. तो त्यांचे भविष्य सांगण्यामध्ये खूप प्रसिद्ध होता. याशिवाय अनेक सेलिब्रिटींचा तो खाजगी ज्योतिषी सुद्धा आहे. या बलात्कारी बाबा खरात याचा दावा आहे की, तो मर्चंट नेव्हीचा निवृत्त अधिकारी आहे आणि २२ वर्षे त्यांनं अनेक देशांची सफर केलीय. नेव्हीच्या नोकरीतू निवृत्त झाल्यानंतर त्यांनं ब्रह्मांडाच्या उत्पत्ती आणि रचनेचा अभ्यास केल्याचा तो दावा करतो. ज्योतिष क्षेत्रात सुवर्ण पदक जिंकल्याचाही त्याचा दावा आहे. स्वतःला ज्योतिष आणि अंकशास्त्राचा तो तज्ज्ञ म्हणवून घेतो.‘शिवनिका ट्रस्ट’चा तो प्रमुख आहे आणि ईशानेश्वर मंदिराचं व्यवस्थापनही तो पाहात होता.

महिलांचे आणि सेलिब्रिटींचे व्हिडीओ समोर येण्याची शक्यता

एका ३५ वर्षीय महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीवरून नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी या स्वयंघोषित ‘कॅप्टन’ अशोक खरातला अटक केलीय. खरातच्या काळ्या कृत्यांची पोलखोल ईथूनच सुरू झाली. या पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, खरातनं तिच्यावर बलात्कार केला. खरातच्या कार्यालयातून अनेक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडीओ पोलीसांच्या हाती लागलेत. पोलिसांनी त्याचा पेन ड्राईव्ह जप्त केला आणि त्यातून अत्यंत धक्कादायक खुलासे समोर आलेत. ज्यात ५८ आपत्तिजनक व्हिडीओ आहेत. या व्हिडीओमध्ये अनेक महिलांचे आणि कथित सेलिब्रिटींची नाव समोर येण्याची शक्यता आहे. त्याच्या सिन्नर ईथल्या कार्यालयावरही पोलीसांनी धाड टाकली. आणि अनेक धक्कादायक गोष्टी जप्त केल्यात.

अनेक छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावले

पोलिस सूत्रांच्या मते, या बाबानं त्याच्या ओकस प्रॉपर्टी डीलर अँड डेव्हलपर्स कार्यालयात अनेक छुपे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. महिलांना भविष्याची भीती दाखवून, तसंच त्यांना इतर प्रलोभन देण्याचं लालच दाखवून त्यांच्यावर अत्याचार करायचा आणि याचे व्हिडीओ रेकॉर्ड करायचा. आता नाशिक क्राइम ब्रांच तपास करतय की, या ५८ व्हिडीओमध्ये कोणत्या नामांकित महिला आणि सेलिब्रिटी आहेत. हे व्हिडीओ पोलीसांच्या हाती लागल्यानं अनेक मोठ्या मान्यवरांची झोप उडाली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचं नाव समोर

सगळ्यात मोठं नामांकित नाव समोर आलंय ते म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचं. चाकणकर बाईं या बलात्कारी बाबाच्या ईतक्या आहारी गेल्याचं दिसून येतंय की या बाबाचे त्या चक्क पाय धुवत होत्या. या बाबाचे ईतके अश्लिल व्हिडीओ समोर आलेत की ते आपण पाहू ही शकत नाही आणि अशा माणसाचे पाय धुणं आणि त्याच्या ट्रस्टमध्ये सदस्य असणं हे चाकणकरांना शोभतं का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचे धाबे आता दणाणले

सध्या अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीय. अनेक राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींचे धाबे आता दणाणले आहेत, आता या प्रकरणात आणखी कोणती मोठी नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.

img

Prakash

Web Content Producer

प्रकाश हराळे हे परखड, निर्भीड आणि निःपक्षपाती पत्रकार आहेत. सध्या ते LS मराठी येथे 'डिजिटल कंटेंट प्रोड्युसर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हराळे यांना दैनिक राष्ट्रसंचार, एज्युवार्ता न्यूज पोर्टल वृत्तसंस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. प्रकाश हे जवळपास ५ वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी पुण्यातील "मराठवाडा मित्र मंडळ" या नामांकित महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवीत्तर पदवीचे शिक्षण घेतलं आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखन आणि सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याची आवड आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts