• Home
  • महाराष्ट्र
  • पाकिस्तानी क्रीम थेट महाराष्ट्रात! कोण करतंय मदत? FDA च्या कारवाईत मोठा खुलासा
Top News

पाकिस्तानी क्रीम थेट महाराष्ट्रात! कोण करतंय मदत? FDA च्या कारवाईत मोठा खुलासा

Pakistani Cream in Maharashtra

Pakistani Cream in Maharashtra : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी वस्तूंचा सुळसुळाट वाढल्याचे दिसून येत आहे….पाकिस्तान संधी मिळेल तेव्हा, भारतात दहशतवादी पाठवून हल्ला घडवून आणतो…पाकिस्तानातून दहशतवादी भारतात येऊ नये म्हणून रात्रं-दिवस भारतीय जवान सीमेवर लक्ष ठेवून असतात…मात्र असं असताना देखील महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी वस्तू सर्रास विक्रीसाठी उपलब्ध असल्याच्या दिसून येत आहे…आता पाकिस्तानात तयार होणारी ( Pakistani Cream ) ‘गोरी ब्युटी क्रीम’ ( Gori Beauty Cream ) आणि ‘गोरी डे अँड नाईट क्रीम’ अहिल्यानगरमध्ये आढळल्या आहेत…FDA ने एका दुकानावर छापा टाकत या क्रीम जप्त केल्या आहेत..त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे…पाहूयात की पाकिस्तानातील वस्तू थेट महाराष्ट्रात कशा येत आहेत? पाकिस्तानच्या वस्तू जर महाराष्ट्रात येत असतील तर पाकिस्तानी नागरिक देखील महाराष्ट्रात आले असतील का? पाकिस्तानी वस्तू भारतात आणण्यासाठी कुणी मदत करतंय का?

अहिल्यानगरमध्ये FDA ची धडक कारवाई

पाकिस्तानमधील वस्तू भारतात येऊ नये, याची विशेष खबरदारी घेतली जाते….सीमेवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे..मात्र असं असतानाही महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये पाकिस्तानात तयार होणाऱ्या बेकायदेशीर वस्तू आणि सौंदर्यप्रसाधनांचा सुळसुळाट प्रचंड वाढला आहे…अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर येथील गोल्डन मार्केटमध्ये अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून ‘Made in Pakistan’ असा स्पष्ट उल्लेख असलेला ‘गोरी ब्युटी क्रीम’चा मोठा साठा जप्त केला..दुकानदार शाहीद रियाज शेखला (वय ३६) चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे…या धक्कादायक कारवाईमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, हा प्रश्न आता केवळ आरोग्यापुरता मर्यादित न राहता देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा अत्यंत गंभीर मुद्दा बनला आहे…

हेही वाचा : जळगावमध्ये पुन्हा ‘सैराट’! बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग, बहिणीच्या पतीची भावाकडून हत्या

Made in Pakistan’ क्रीमचा मोठा साठा जप्त ( Pakistani Cream in Maharashtra )

पूर्वी अशा पाकिस्तानी आणि प्रतिबंधित वस्तूंची विक्री केवळ ठाण्यातील भिवंडी, मुंब्रा किंवा मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटसारख्या विशिष्ट आणि संवेदनशील भागांपुरतीच मर्यादित असल्याचे मानले जात होते… मात्र, आता हे जाळे संपूर्ण महाराष्ट्रात पसरल्याचे दिसून येत आहे… छत्रपती संभाजीनगर, धुळे, नागपूर आणि आता थेट अहिल्यानगरसारख्या जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांतील दुकानांमध्येही ही पाकिस्तानी उत्पादने उघडपणे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईत समोर आले आहे… अधिकृत परवाना किंवा भारताच्या केंद्रीय ड्रग्ज कंट्रोलरची कोणतीही परवानगी नसताना हा माल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचला कसा, असा मोठा प्रश्न निर्माण झालाय…

पुलवामा हल्ल्यानंतर आणि पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानसोबतच्या अधिकृत व्यापारावर पूर्णपणे बंदी घातली आहे.. असे असतानाही “Made in Pakistan” लेबल असलेली उत्पादने भारतीय बाजारपेठेत आणि महाराष्ट्रात विक्रीसाठी सर्रास उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे…आता या वस्तू पाकिस्तानमधून थेट भारतात येत आहेत की इतर देशांच्या माध्यमातून भारतात येत आहेत? याची माहिती अद्याप मिळालेली नाही..जर पाकिस्तानातून या वस्तू थेट भारतात येत असेल तर त्यांना भारतात वस्तू आणण्यासाठी कोण मदत करतंय याचा शोध घेणं खूप गरजेचं आहे…जर पाकिस्तान ब्युटी क्रीम भारतात पाठवू शकतो, तर बंदूक आणि इतर शस्त्रे देखील सहज भारतात पाठवू शकतो, असं म्हटलं जात आहे…

पाकिस्तानी उत्पादने भारतात कशी पोहोचतात? ( Pakistani Cream in Maharashtra )

सध्या तरी ही उत्पादने थेट पाकिस्तानातून न येता दुबई किंवा इतर आखाती देशांच्या मार्गाने छुप्या पद्धतीने समुद्रमार्गे भारतात आणली जात आहेत असं म्हटलं जात आहे… तसंच भारत-नेपाळ किंवा भारत-बांगलादेशच्या खुल्या सीमांचा गैरफायदा घेऊन हे रॅकेट आंतरराष्ट्रीय तस्करांच्या माध्यमातून भारतात हा माल पुरवत असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे…पण याकडे भारत सरकारला बारकाईने लक्ष देणं खूप गरजेचं आहे..कारण एक चूक झाली तर ती अनेक जणांचा जीव घेते..हे आपण पहलगाम हल्ल्यामध्ये पाहिले आहे…

अन्न व औषध प्रशासनाच्या प्रयोगशाळेतील तपासणीत या पाकिस्तानी ‘गोरी क्रीम’ ( Gori Beauty Cream ) मध्ये मानवी आरोग्याला अत्यंत घातक असणारे ‘पारा’ आणि ‘शिसे’ या रसायनांचे प्रमाण मर्यादेपेक्षा 700 ते 750 पटीने जास्त आढळले आहे. या क्रीमच्या वापरामुळे महिलांच्या त्वचेचे कायमचे नुकसान तर होतेच, पण ही रसायने त्वचे वाटे शरीरात शोषली गेल्याने थेट किडनी निकामी होत असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे…पाकिस्तान या क्रीमच्या माध्यमातून भारतात, काही महामारी तर पसरवण्याचा प्रयत्न करत नाही ना? असा प्रश्न निर्माण झालाय…जर किडनी निकामी होत असेल तर माणसाचा थेट मृत्यू देखील होतो…म्हणजे पाकिस्तान थेट हत्यार न वापरता दुसऱ्या मार्गाने भारतावर आक्रमण तर करत नाहीये ना? असा प्रश्न निर्माण झालाय…

प्रशासनाने कोणती कारवाई केली?

या संपूर्ण प्रकरणात सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे देशाची सुरक्षा आहे…जर पाकिस्तानात तयार झालेल्या वस्तू देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमा, कस्टम विभाग आणि सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देऊन महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या गावांमधील दुकानांपर्यंत सहज पोहोचू शकतात, तर याच छुप्या मार्गांचा वापर करून उद्या पाकिस्तानी नागरिक किंवा दहशतवादी देखील भारतात प्रवेश करू शकत नाहीत का, अशी भीती आता नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.. जसे या वस्तू देशात येत आहेत, तसे पाकिस्तानी लोक, दहशतवादीही भारतात येत असतील, असा संशय यावरून निर्माण होत आहे…

यंत्रणेच्या ढिसाळपणामुळे किंवा सुरक्षेतील त्रुटींमुळे हा प्रतिबंधित माल देशात घुसत आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय..याच त्रुटींचा फायदा शत्रू देश भारतामध्ये घुसखोरी करण्यासाठी, मोठा दहशतवादी हल्ला करण्यासाठी घेऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.. महाराष्ट्रात झालेली ही कारवाई केवळ एका ब्युटी क्रीमची जप्ती नसून, देशाच्या सीमेवरील सुरक्षेच्या चिंधड्या उडवणारे एक मोठे लक्षण आहे… हा काळा बाजार रोखण्यासाठी केवळ स्थानिक पोलिसांची किंवा अन्न व औषध प्रशासनाची कारवाई पुरेशी नाही… यासाठी सीमा सुरक्षा दल, राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि कस्टम्स विभागाने या संपूर्ण पुरवठा साखळीचा मुळापासून छडा लावणे गरजेचे आहे.. जर ही आंतरराष्ट्रीय तस्करी वेळीच रोखली गेली नाही, तर हा निष्काळजीपणा भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महागडा ठरू शकतो…

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts