Jubin Nautiyal Marriage | बॉलिवूडचा स्टार गायक जुबिन नौटियाल (Jubin Nautiyal) विवाहबंधनात अडकला आहे. जुबिन नौटियालने त्याच्या बालमैत्रिणीसोबत गुपचूप लग्न केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जुबिनने उत्तराखंडमधील त्याच्या वडिलोपार्जित गावात त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत लग्न केले आहे. सध्या जुबिनच्या लग्नसोहळ्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते हे व्हिडीओ समोर येताच चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.
हेही वाचा – गोविंदा कुटुंबातील मतभेद संपले; 14 वर्षांनंतर कृष्णा अभिषेक-सुनीता पुन्हा एकत्र
जुबिन नौटियालने बालमैत्रिणीसोबत गुपचूक केले लग्न
मिळालेल्या माहितीनुसार, जुबिनने नुकतंच उत्तराखंडमध्ये गुपचूप लग्न केले आहे. या लग्नाला जुबिनचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. जुबिनने कोणत्याही भव्य सोहळ्याऐवजी अगदी साधेपणाने लग्न केले आहे. जुबिनची पत्नी त्याची बालपणीची मैत्रीण असून, ते दोघे काही काळापासून नात्यात आहेत.
पापाराझी अकाऊंट व्हायरल भयानीनेही आपल्या इंस्टाग्रामवर जुबिनच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जुबिन लग्नाचे विधी करताना दिसत आहे. जुबिनचे हे फोटो पाहून चाहत्यांनी त्याचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे. या पोस्टच्या कमेंट्समध्ये चाहत्यांनी गायकाचे अभिनंदन केले असून त्याच्या नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी प्रार्थना केली आहे. इतकेच नाही, तर जुबिनच्या पत्नीबद्दल चाहत्यांची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत होती. तथापि, जुबिनची पत्नी कोण आहे आणि त्यांची प्रेमकथा कशी सुरू झाली, हे अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही.
View this post on Instagram
जुबिन एक लोकप्रिय बॉलीवूड गायक मानला जातो आणि त्याने अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. इतकेच नाही तर, त्याने 111 हून अधिक चित्रपट आणि म्युझिक व्हिडिओंना आपला आवाज दिला आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर 2’ या चित्रपटातील ‘आखिरी इश्क’ या गाण्यात त्याने योगदान दिले आहे. यापूर्वीही त्याने बॉलीवूड चित्रपटांमध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली आहेत. आता तो त्याच्या लग्नामुळे चर्चेत आहे.






