Bigg Boss Marathi 6 | ‘बिग बॉस मराठी 6’ (Bigg Boss Marathi 6) चा महाअंतिम सोहळ जवळ आला आहे. त्यामुळे आता या सीझनची ट्रॉफी कोण जिंकणार? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सध्याच्या या सीझनमधील स्पर्धकांमध्ये खूपच चुरशीची लढत दिसत आहेत. त्यामुळे यंदा बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच आता ‘बिग बॉस मराठी 6’ चे टॉप पाच फायनलिस्टची नावे घोषित करण्यात आली आहेत.
हेही वाचा – भीषण दुर्घटना! कर्नाटकात कमान कोसळून 2 मुलांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी
कोण आहेत ‘बिग बॉस मराठी 6’ चे टॉप 5 फायनलिस्ट?
‘बिग बॉस मराठी 6’ चा महाअंतिम सोहळा आज (19 एप्रिल) अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर होणार आहे. तर या सिझनच्या टॉप 5 फायनलिस्टमध्ये तन्वी कोलते, राकेश बापट, अनुश्री माने, दीपाली सय्यद आणि विशाल कोटियन या स्पर्धकांचा समावेश आहे. तर हा शो जिंकण्याच्या शर्यतीत कोणता स्पर्धक आघाडीवर आहे, याकडे प्रेक्षक ऑनलाइन व्होटिंगच्या ताज्या ट्रेंडवर लक्ष ठेवून आहेत. सध्या स्पर्धा खूपच चुरशीची दिसत असून प्रत्येक फायनलिस्टला जिंकण्याची समान संधी आहे.
सध्याच्या ऑनलाइन मतदानाच्या ट्रेंडनुसार, तन्वी कोलते आणि राकेश बापट यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. दोघेही सध्या आघाडीवर दिसत आहेत. राकेशला त्याच्या प्रचंड लोकप्रियतेमुळे मतदानात फायदा मिळत आहे. तर तन्वीचा मोठा चाहतावर्ग अजूनही निकालावर प्रभाव टाकू शकतो. अनुश्री माने पहिल्या दोन स्पर्धकांच्या अगदी मागे आहे. तर विशाल कोटियन आणि दिपाली सय्यद अजूनही मागे आहेत.
View this post on Instagram
रेडिटवरील एका व्हायरल पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, विशालने कदाचित हा सीझन आधीच जिंकला आहे, ज्यामुळे फिनालेपूर्वीच्या चर्चांना आणखी जोर चढला आहे. तर अंतिम निकाल केवळ ग्रँड फिनालेचा एपिसोड प्रसारित झाल्यानंतरच कळेल. बिग बॉस मराठी 6 च्या विजेत्याला एक ट्रॉफी आणि 15 लाख रुपयांचे रोख बक्षीस मिळेल. मिळालेल्या माहितीनुसार, राखी सावंतने बक्षिसाच्या रकमेत 7 लाख रुपयांची भर घातल्याने ही रक्कम वाढली आहे.












