177
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे बोलेरो कार थेट कालव्यात जाऊन कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील नऊ जणांसह 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी हि घटना घडली असून एनडीआरएफच्या पथकाने कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी शोक व्यक्त केला आहे.









