पैठण शहरातील भाजी मंडई परिसरातील महा ई सेवा केंद्राला रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात असून महा ई सेवा केंद्रातील महत्त्वाचे कागदपत्रासह कॅम्पुटर, लॅपटॉप, झेरॉक्स मशीन, लॅमिनेशन मशीन, फर्निचर आदी वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या आगीत महा इ सेवा चालकाचे चार-पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचे प्राथमिक माहिती आहे.












