ताज्या बातम्या

महालक्ष्मी मंदिराच्या गडावर दरड कोसळली

Landslide at Mahalaxmi Temple fort in Dahanu
165

डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिराच्या गडावर मोठी दरड कोसळण्याची घटना पहाटे घडली. गडावरील पायी जाणाऱ्या मार्गावर गडाचा काही भाग कोसळल्याने अचानक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गडावरील दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. दरड कोसळल्यामुळे सध्या गडावर पायी जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला असून प्रशासनाने भाविक आणि पर्यटकांना पुढील काही दिवस गडावर जाणे टाळावे, असे आवाहन केले आहे. तसेच आवश्यक ती दुरुस्ती आणि सुरक्षेची उपाययोजना तातडीने करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts