Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधी विद्यार्थी संघटनांमध्ये वाद; NSUI-ABVPमध्ये नेमकं काय घडलं?
राजकारण

राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधी विद्यार्थी संघटनांमध्ये वाद; NSUI-ABVPमध्ये नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi Pune Visit
Rahul Gandhi Pune Visit: राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याआधीच विद्यार्थी संघटनांमध्ये वाद पेटला आहे. NSUI आणि ABVPकडून एकमेकांवर गंभीर आरोप करण्यात आले असून, विद्यार्थिनीला धमकावल्यापासून ते कार्यकर्त्यांना मारहाण केल्याच्या आरोपांपर्यंत प्रकरण पोहोचलं आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज २२ ऑगस्ट २०२६ रोजी पुण्यात ‘छात्रों की गुंज’ (Chhatron Ki Goonj) या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. मात्र त्यांच्या कार्यक्रमाआधीच पुण्यात राजकीय वातावरण तापलं असून NSUI आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं समोर आलं आहे. दोन्ही विद्यार्थी संघटनांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

NSUIकडून विद्यार्थिनीला धमकावल्याचा आरोप

NSUIने आरोप केला आहे की, एका विद्यार्थ्यांनीला ABVPच्या (ABVP news Pune) कार्यकर्त्यांनी दबाव आणून माफी मागायला लावली. कॉलेजमधील फी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत विद्यार्थ्यांनीने केलेल्या वक्तव्यावरून हा वाद सुरू झाल्याचं सांगितलं जात आहे.

NSUIच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की, संबंधित विद्यार्थिनीला धमकावण्यात आलं आणि तिच्याकडून चुकीची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणावरून काँग्रेसकडून ABVPविरोधात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा: 12 हजार अर्ज, पण निवड फक्त 80 विद्यार्थ्यांची! IIM बंगळुरूमध्ये नव्या UG स्कूलची सुरुवात

ABVPचा NSUIवर पलटवार (NSUI-ABVP Clash)

दुसरीकडे ABVPने हे आरोप फेटाळून लावत NSUIवरच गंभीर आरोप केले आहेत. कॉलेजमध्ये जास्त फी आकारली जाते, असं बोलण्यासाठी NSUIकडून विद्यार्थ्यांवर दबाव आणला जात असल्याचा दावा ABVPने केला आहे.

ABVPच्या म्हणण्यानुसार, या वादादरम्यान काँग्रेसशी संबंधित सुमारे २०० कार्यकर्त्यांनी ABVPच्या चार कार्यकर्त्यांना मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.

काँग्रेस नेत्यांचं ठिय्या आंदोलन

या घटनेनंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्तेही आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विश्वजित कदम आणि सतेज पाटील यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी ठिय्या आंदोलन केल्याची माहिती आहे. काँग्रेसकडून ABVPविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

‘मुलींच्या पाठीशी उभं राहायला हवं होतं’

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिवानी वडेट्टीवार यांनी ABVPने विद्यार्थिनीला पाठिंबा द्यायला हवा होता, अशी भूमिका मांडली. दरम्यान, राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाआधीच NSUI आणि ABVPमधील हा वाद चांगलाच पेटल्याने आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरणाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोन्ही संघटनांकडून करण्यात आलेल्या आरोपांची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts