Breaking News :
  • Home
  • एजुकेशन- जॉब
  • नवोदय विद्यालयात 6वीला प्रवेश हवा? आजच करा अर्ज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार करेक्शन विंडो
एजुकेशन- जॉब

नवोदय विद्यालयात 6वीला प्रवेश हवा? आजच करा अर्ज; ‘या’ तारखेपासून सुरू होणार करेक्शन विंडो

JNVST 2027-28 Class 6 Admission
JNVST 2027-28 Class 6 Admission: JNVST 2027-28 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज शेवटची संधी आहे. अर्ज भरताना काही चूक झाल्यास 11 आणि 12 ऑगस्ट रोजी करेक्शन विंडोद्वारे त्यात दुरुस्ती करता येणार आहे.

आपल्या मुलाला जवाहन नवोदय विद्यालयात इयत्ता ६ वीमध्ये प्रवेश मिळवून देण्याची इच्छा असलेल्या पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. JNVST 2027-28 Class 6 Admission साठी ऑनलाइन अर्ज करण्याची आज, 10 ऑगस्ट 2026, अंतिम मुदत आहे. त्यामुळे अद्याप अर्ज न केलेल्या पात्र विद्यार्थ्यांनी आजच नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.

जवाहर नवोदय विद्यालय (Navodaya Admission 2027) समितीकडून इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी घेतली जाते. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली होती. आता अंतिम मुदत संपत असल्याने विद्यार्थ्यांनी शेवटच्या (JNVST Exam Date) क्षणाची वाट न पाहता अर्ज साद करणे आवश्यक आहे.

हेही वाचा: शहनाज गिलच्या घशात अडकली नोज रिंग; तरीही शूटिंग थांबवलं नाही, पाहा व्हिडीओ व्हायरल

अर्ज केल्यानंतर दुरुस्तीची संधी

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना अर्जातील काही माहिती दुरुस्त करण्याची संधी मिळणार आहे. ११ आणि १२ ऑगस्ट २०२६ रोजी करेक्शन विंडो (JNVST Correction Window) उपलब्ध असेल. त्यामुळे अर्ज भरताना माहिती काळजीपूर्वक तपासणे महत्वाचे आहे. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची पावती किंवा कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून भविष्यासाठी जतन करून ठेवावे.

२८ नोव्हेंबरला प्रवेश परीक्षा

इयत्ता ६ वीच्या प्रवेशासाठी JNVST 2027-28 परीक्षा २८ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार आहे. समर बाउंड आणि विंटर बाउंड नवोदय विद्यालयांमधील प्रवेशासाठी ही निवड परीक्षा घेतली जाणार आहे.

परीक्षेचा निकाल मार्च किंवा एप्रिल २०२७ दरम्यान जाहीर होण्याची शक्यता आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर रोल नंबरच्या माध्यमातून निकाल पाहता येईल.

महत्त्वाच्या तारखा

नोंदणी सुरू : 6 जुलै 2026
अर्जाची अंतिम मुदत : 10 ऑगस्ट 2026
अर्ज दुरुस्तीची सुविधा : 11 आणि 12 ऑगस्ट 2026
JNVST परीक्षा : 28 नोव्हेंबर 2026
निकाल : मार्च-एप्रिल 2027 मध्ये अपेक्षित

नवोदय प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? (JNVST 2027-28 Class 6 Admission)

अर्ज करण्यासाठी प्रथम जवाहर नवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत वेबसाइट navodaya.gov.in वर जा. त्यानंतर इयत्ता 6वी JNVST 2027-28 साठी दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा. आवश्यक वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती भरा. त्यानंतर मागितलेली कागदपत्रे अपलोड करून अर्ज सबमिट करा. अर्ज पूर्ण झाल्यानंतर कन्फर्मेशन पेजची प्रत डाउनलोड करून सुरक्षित ठेवा.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

अर्ज भरताना विद्यार्थ्याचा पासपोर्ट साइज फोटो, विद्यार्थ्याची स्वाक्षरी, पालकांची स्वाक्षरी, मुख्याध्यापकांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि आवश्यक असल्यास जात प्रमाणपत्र अशी कागदपत्रे तयार ठेवावीत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts