Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मोबाइल वापरकर्त्यांनो, लक्ष द्या! 10वे SIM कार्ड आता मिळणार नाही; काय आहे नवा नियम?
बिजनेस

मोबाइल वापरकर्त्यांनो, लक्ष द्या! 10वे SIM कार्ड आता मिळणार नाही; काय आहे नवा नियम?

New SIM Card Rule
3
New SIM Card Rule: मोबाइल वापरकर्त्यांनो जर तुमच्या नावानी ९ सिम कार्ड असतील तर आता १० वे SIM card मिळणार नाही. जाणून घ्या हा नियम नेमका काय आहे आणि तुमच्यावर त्याचा काय परिणाम होईल.

मोबाइल कनेक्शनच्या संस्थेबाबत सरकारने नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. २४ ऑगस्ट २०२६ पासून नवीन SIM कार्ड घेण्यापूर्वी ग्राहकाच्या नावावर आधीपासून किती मोबाईल नंबर सक्रिय आहेत, याची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे ठरवलेल्या मर्यादेपर्यंत कनेक्शन असलेल्या व्यक्तीला आणखी SIM मिळणार नाही.

एका व्यक्तीला किती SIM ठेवता येतात? (SIM rules August 2026)

देशातील बहुतांश भागात एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ मोबाइल कनेक्शन ठेवण्याची परवानगी आहे. ही संख्या एका कंपनीपुरती मर्यादित नसून सर्व कंपन्यांचे नंबर एकत्र मोजले जातील.

उदाहरणार्थ, तुमच्याकडे Jio चे ४, Airtel चे ३ आणि Vi २ नंबर असतील, तर एकूण संख्या ९ होते. अशा परिस्थतीत तुम्ही कोणत्याही कंपनीचा आणखी नंबर घेऊ शकणार नाही. जम्मू- काश्मीर, आसाम आणि ईशान्य भारतातील काही भागांसाठी ही मर्यादा ६ कनेक्शन आहे.

हेही वाचा: साखरेचे भाव कडाडले, सणासुदीआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये; 10 लाख टन आयातीचा मोठा निर्णय

नवीन नियम कसा काम करेल?

SIM घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर टेलिकॉम कंपनी तुमच्या नावावर नोंद असलेल्या मोबाइलकनेक्शनची संस्था तपासेल. यासाठी दूरसंचार विभागाच्या डिजिटल प्रणालीचा वापर केला जाणार आहे. ग्राहकाकडूनही आपल्या नावावर असलेल्या मोबाईल नंबरची माहिती देण्याची अपेक्षा असेल.

जर एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर मर्यादेपेक्षा जास्त नंबर आढळले, तर अतिरिक्त कनेक्शनवर कारवाई होऊ शकते. पुढील काळात ही तपासणी अधिक जलद आणि रिअल-टाइम करण्याची योजना आहे.

या निर्णयामागे कारण काय?

बनावट कागदपत्रे, दुसऱ्यांच्या ओळखीचा गैरवापर आणि मोठ्या प्रमाणावर SIM वापरून होणाऱ्या सायबर फसवणुकीला आळा घालणे हा या नियमांचा प्रमुख उद्देश आहे. मोठ्या संख्येने SIM वापरणाऱ्या संशयास्पद व्यवहारांवरही यामुळे नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते.

तुमच्या नावावर किती नंबर आहेत ते तपासा

तुमच्या नावावर अनोळखी मोबाइल नंबर नोंदलेला आहे का, हे संचार साथीच्या TAFCOP सुविधेद्वारे तपासता येते. अनोळखी नंबर आढळल्यास त्याबाबत तक्रार किंवा रिपोर्ट करता येतो.

त्यामुळे नवीन SIM घेण्यापूर्वी तुमच्या नावावर आधीपासून किती मोबाइल कनेक्शन आहेत, हे तपासणे योग्य ठरेल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts