ताज्या बातम्या

चांदोलीतून 36630 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; पाणी पात्राबाहेर

Chandoli dam releases 36630 cusecs
152

चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. पर्यायाने धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सायंकाळी चारच्या दरम्यान धरणातून सुरु असलेल्या 29 हजार 985 क्युसेक्स विसर्गात वाढ करण्यात आली आहे.धरणाच्या वक्राकार दरवाज्यातून 35000 क्युसेक्स व वीज निर्मिती केंद्रातून 1630 क्युसेक्स असा एकूण 36 हजार 630 क्युसेक्स विसर्ग वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts