कॉर्ट इन प्रोव्हिडन्स’ या लोकप्रिय रियालिटी शोमधून जागतिक स्तरावर ओळख मिळवलेले अमेरिकेचे माजी न्यायाधीश फ्रॅंक कॅप्रिओ यांचे वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले. ते काही काळापासून स्वादुपिंडाच्या कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या करुणामय न्यायनिवाड्यामुळे जगभरातील लाखो लोकांच्या हृदयात त्यांनी स्थान मिळवले होते.












