Breaking News :
  • Home
  • क्रीडा
  • आशिया चषक: सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्यांचा पराभव; बांगलादेशचा शेवटच्या षटकात विजय
क्रीडा

आशिया चषक: सुपर-4 च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्यांचा पराभव; बांगलादेशचा शेवटच्या षटकात विजय

Your paragraph text 1
211

दुबई : आशिया कप 2025 च्या पहिल्या सुपर-4 सामन्यात बांगलादेश क्रिकेट संघानं श्रीलंकेचा 4 विकेट्सने पराभव केला. सामन्याच्या शेवटच्या षटकात बांगलादेशनं विजय मिळवला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 20 षटकांत 7 विकेट्स गमावून 168 धावा केल्या. श्रीलंकेकडून दासुन शनाका हा एकमेव फलंदाज होता ज्यानं अर्धशतक झळकावलं. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19.5 षटकांत 6 विकेट्स गमावून 163 धावा केल्या.

दासुन शनाकाची शानदार फलंदाजी :

नाणेफेक गमावल्यानंतर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली. यानंतर पथुम निस्सांका आणि कुसल मेंडिस यांनी पहिल्या विकेटसाठी 44 धावांची भागीदारी करुन संघाला चांगली सुरुवात करुन दिली. पहिली विकेट पडल्यानंतर, श्रीलंकेने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. पथुम निस्सांका (22 धावा), कुसल मेंडिस (34 धावा), कुसल परेरा (16 धावा) आणि चरिथ असलंका (21 धावा) यांनी चांगली सुरुवात केली पण त्यांना मोठ्या धावसंख्येत रुपांतरित करण्यात अपयश आलं. श्रीलंकेकडून एकमेव अर्धशतक दासुन शनाकाचं होतं. जो 37 चेंडूत 64 धावा करत नाबाद राहिला. त्यानं आपल्या डावात तीन चौकार आणि सहा षटकार मारले. बांगलादेशकडून मुस्तफिजूर रहमाननं शानदार गोलंदाजी केली आणि चार षटकांत फक्त 20 धावा देत 3 बळी घेतले.

बांगलादेशकडून सैफ हसन आणि तौहीद हृदोयच अर्धशतकं :

श्रीलंकेने दिलेल्या 169 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशला खराब सुरुवात करावी लागली. पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर तन्झिद हसन तमीम दोन चेंडूंनंतर बाद झाला. त्यानंतर सैफ हसन आणि लिटन दास यांनी दुसऱ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. या सामन्यात लिटन दास 16 चेंडूत 23 धावा करुन बाद झाला. यानंतर, संघाला 114 धावसंख्येवर तिसरा धक्का बसला. सैफ हसन 45 चेंडूत 61 धावा करुन बाद झाला. यानंतर तौहीद हृदोयने उर्वरित काम केलं तो 37 चेंडूत 58 धावा करुन बाद झाला. शेवटी, शमीम हुसेन 12 चेंडूत 14 धावा करुन नाबाद राहिला. श्रीलंकेकडून वानिन्दु हसरंगानं 4 षटकांत 22 धावा देत 2 बळी घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts